Posts

Showing posts from May, 2024

१२ वी बोर्ड परीक्षेत इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाची दिव्या भेगडे मावळ विभागात प्रथम

Image
तळेगाव दाभाडे: दि 21  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी २०२३-२४ रोजी घेण्यात आलेल्या १२ वी बोर्ड परीक्षेत इंद्रायणी महाविद्यालयातील  मुलींनी बाजी मारली आहे. इंद्रायणी महाविद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेला साजेसा निकाल यंदाच्याही वर्षी लागला असून कला, वाणिज्य, विज्ञान व तंत्रशिक्षण शाखांतील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशावर आपले नाव कोरले आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९८.०७%, वाणिज्य शाखेचा निकाल ८९.२२% इतका लागला असून कला शाखेचा निकाल ७३.२५% इतका लागला आहे. तंत्रशिक्षण विभागाचा निकाल हा ९२.५०% इतका लागला आहे. या निकालात याही वर्षी विद्यार्थिनींनी आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.  विज्ञान शाखेतून कु.भेगडे दिव्या संदीप या विद्यार्थिनीने ९५.१७% इतके गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला असून. रसायनशास्त्र या विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त करून विशेष प्राविण्य मिळवले आहे. वाणिज्य शाखेतून कु. पडवळ सार्थक रोहिदास या विद्यार्थ्यांने ८९.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला आहे.  कला शाखेतून कु. मराठे वैष्णवी साहेबराव हीने ७५.३३%  गु...

उद्या श्री बनेश्वर महादेवांचा चंदन उटी सोहळा

Image
तळेगाव स्टेशन दि. 8 "अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय मुहूर्तावर" शुक्रवार, दिनांक - १० मे २०२४ रोजी  श्री बनेश्वर मंदिर तळेगाव दाभाडे येथील श्री बनेश्वर महादेवांचा चंदन उटी सोहळा व एकतारी भजन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. चंदन उटी सोहळ्याचे हे २४ वे वर्ष असून या वर्षीही विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .  या वर्षी ०५ किलो चंदनाचा लेप महादेवाच्या शिवलिंगाला लावून तसेच  विविध प्रकारच्या  100 किलो  फुलांची आकर्षक सजावट करून भव्य असा चंदन उटी सोहळा साजरा करणार आहे.   श्री बनेश्वर सेवा मंडळ व नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी या मुहूर्तावर हा सोहळा आयोजीत केला जातो.  अक्षय्य तृतीया हा एक पवीत्र मुहूर्त आहे. या दिवशी केलेल्या शुभारंभाचे फल हे अक्षय्य राहते. साडेतीन मुहूतपैिकी एक मुहूर्त असलेला हा दिवस म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया होय. याच दिवशी भगवान विष्णुंचा सहावा अवतार असेलल्या भगवान परशुरामांचा जन्म झाला. याच दिवशी व्यासमुनिंनी श्री गणेशाला महाभारत सांगुन त्याच्याकडुन लेखन करवुन घेतले. अनादीकाळापासुन हा सण साजरा के...