प्रथम नगराध्यक्ष श्रीमंत सरसेनापती खंडेराव बाबुराव दाभाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

तळेगाव दाभाडे दि. २० (प्रतिनिधी) तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष श्रीमंत सरसेनापती खंडेराव बाबुराव दाभाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक आणि माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष रविंद्र दाभाडे, भाजप शहराध्यक्ष संतोष दाभाडे उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे, नगर रचनाकार विश्वजित कदम, शहर अभियंता राम सरगर, लेखापाल जयश्री साईखेडे, लेखा परीक्षक नरेंद्र कणसे, भांडार विभाग प्रमुख सिद्धेश्वर महाजन, संगणक अभियंता सोनाली सासवडे, उद्यान पर्यवेक्षक विशाल मिंड, कर निरीक्षक मोनिका झरेकर, स्वच्छता निरीक्षक प्रमोद फुले, वरिष्ठ लिपिक भास्कर वाघमारे, कर संकलन लिपिक प्रविण माने, प्रफुल्ल गलीयत, प्रविण शिंदे, प्रशांत गायकवाड, विलास वाघमारे, उषा बेल्हेकर, विशाल लोणारे, अरविंद पुंड, लिपिक रोहित भोसले, बाळासाहेब पवळे, एन.यु.एल.एम. समन्वयक विभा वाणी, शिपाई अनिल इंगळे, रुपेश देशमुख, चंद्रशेखर खंते, राजेश भुजबळ, सुरज शिंदे, शितल कडूसकर, अनि...