व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, लोणावळा महाविद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न
व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, लोणावळा महाविद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न तळेगाव स्टेशन (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि. ८ मार्च २०२३ येथील व्ही.पी.एस.कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी , लोणावळा येथे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. सोनी राघो यांनी महिला दिनानिमित्त थोडक्यात मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमावेळी सर्व महिला कर्मचाऱ्यांना पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या व केक कट करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमावेळी प्रा.सोनी राघो, प्रा. प्रीती चोरडे, प्रा. रश्मी भुंबरे, प्रा. मनीषा कचरे, सौ. पूजा साठे, कु. सुप्रिया पेठकर, कु. स्वाती म्हस्के, कु. प्रीतीजा घोलप, आणि सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.