अध्यापक महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
अध्यापक महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
तळेगांव स्टेशन(वार्ताहर) दिनांक 8 मार्च 2023 हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला, सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ. स्मिता धुमाळ , ॲड. अर्चना ढोरे व प्रा.वंदना केमसे होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्मिता धुमाळ यांनी भूषवले त्यांनी आपल्या भाषणात रोजगार संधी आणि कौशल्य उद्योजकता यावर विद्यार्थ्यांना माहिती दिली व वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीच्या संधी कशा उपलब्ध आहेत या विषयक मार्गदर्शन केले, ॲड. अर्चना ढोरे यांनी आपल्या भाषणात कौटुंबिक अत्याचार व कायदे यावर मार्गदर्शन केले तसेच कौटुंबिक अत्याचार कसे थांबवता येतील त्याला आळा कसा घालता येईल यावर मार्गदर्शन केले, प्रा. वंदना केमसे यांनी स्वसंरक्षण मार्गदर्शन देऊन विद्यार्थ्यांनी आपले संरक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले व कराटे प्रशिक्षण दिले.
यावेळी प्रा. महादेव सांगळे, डॉ.कविता तोटे, डॉ. संदीप गाडेकर, डॉ. शीतल देवळालकर, प्रा. सोनाली पाटील ,प्रा. सुजाता जाधव व सर्व बी. एड. व एम.एड. विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रम केतकी गटाच्या मार्गदर्शक डॉ. अनिता धायगुडे व जुई गटाच्या मार्गदर्शिका प्रा. ज्योती रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. विद्यार्थी मनोगतात सृष्टी मराठे हिने आपले मनोगत व्यक्त केले नवोदित अभिनेत्री व महाविद्यालयाची विद्यार्थिनी चेतना भारती हिने यावेळी एकांकिका सादर केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिधा यादव हिने केले व आभार प्रदर्शन मनीषा धुतराज हिने मानले
Comments
Post a Comment