अनिकेत थोरात यांचे एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश: सहाय्यक कामगार आयुक्त क्लास वन पदावर होणार नियुक्ती
अनिकेत थोरात यांचे एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश: सहाय्यक कामगार आयुक्त क्लास वन पदावर होणार नियुक्ती पुणे (प्रतिनिधी) दि. 25 नुकताच राज्यसेवा 2021 च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. जवळपास 400 जागांसाठी तीन लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य टीडीएफचे कार्याध्यक्ष जी.के. थोरात यांचे चिरंजीव अनिकेत थोरात यांनी घवघवीत यश संपादन केले असून सहाय्यक कामगार आयुक्त क्लास वन या पदावर त्यांची नियुक्ती निश्चित झालेली आहे. अनिकेत हा टीडीएफ चे राज्य कार्याध्यक्ष, शिक्षक नेते जी.के. थोरात यांचा चिरंजीव असून लहानपणापासूनच त्याला प्रशासकीय सेवेची आवड होती. त्याने सीईओपी, मधून बी.टेक चा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असून तो कायमच गुणवत्ता यादीत आलेला आहे. अतिशय हुशार आणि चाणाक्ष बुद्धिमत्ता अशी त्यांची ओळख होती त्याने आपल्या यशातून हे सिद्ध केले. यापूर्वीच त्याने राज्यसेवेच्या परीक्षेतून नायब तहसीलदार पदाला गवसणी घातली होती सध्या त्याचे या पदासाठीचे प्रशिक्षण चालू...