व्ही.पी.एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी

 व्ही.पी.एस. कॉलेज  ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांनी   फोडली दहीहंडी 



      लोणावळा (प्रतिनिधी) दि. 8 विद्या प्रसारिणी सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे व कार्यवाहक डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाहक श्री. विजय भुरके , गव्हर्निंग कौन्सिलचे मेंबर श्री.भगवान आंबेकर,  ॲड. संदीप अगरवाल व श्री.नितीन गरवारे यांच्या प्रेरणेने महाविद्यालयातील दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला.

          कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाच्या पूजनाने झाली. त्यानंतर श्रीकृष्णाष्टकम स्तोत्राचे पठण करण्यात आले . सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व  विद्यार्थ्यांनी दहीहंडीस सलामी दिली. विशेषतः या कार्यक्रमात मुलींचाही सहभाग होता यावेळी मुलीनी श्रीकृष्णाच्या गाण्यावर नुत्य सादर केले.

          प्रथम वर्षातील मुलांनी थर रचून दहीहंडी फोडली. विध्यार्थ्यांना गोपाळकाला वाटप करून कार्याक्रमची सांगता झाली या वेळी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर,  डॉ हरीश हरसुरकर , प्रो. हुसेन शेख व रोहित जगताप महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रो.सोनी राघो , प्रो.प्रणेश चव्हाण आणि प्रो.मनिषा काचरे यांचे  मोलाचे सहकार्य लाभले.

         कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रो. प्रीती चोरडे तसेच महाविद्यालयातील प्रो.पूनम पोफळकर , प्रो.श्रुती सुखधान, प्रो.तनुजा हुलावळे, प्रो.रश्मी भूंबरे, प्रो.मुबीन खान, श्री. पराग मराठे,  सौ. स्नेहल कुटे, श्री नंदू ठाकर , श्री किशोर देशमुख, श्री गणेश खरमाटे तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश