तळेगाव स्टेशन येथे बुधवारी स्वामी जयंती उत्सव व पालखी सोहळ्याचे आयोजन

तळेगाव स्टेशन दि ८ (वार्ताहर) तळेगाव स्टेशन येथील श्री. स्वामी समर्थ समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) तळेगाव स्टेशन येथे दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी स्वामी जयंती उत्सव व पालखी सोहळ्याचे आयोजन सप्तशृंगी माता मंदिर इंद्रायणी कॉलनी तळेगाव दाभाडे या ठिकाणी करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक सौ.सारिकाताई गणेश काकडे, अध्यक्ष सिद्धिविनायक प्रतिष्ठान तळेगाव स्टेशन यांनी दिली. 

यामध्ये दुपारी तीन वाजलेपासून श्री. स्वामी समर्थ मंत्रांचे हवन, स्वामी समर्थ चरित्र ग्रंथाचे वाचन व हवन, पालखी मिरवणूक सोहळा, आरती व महाप्रसाद अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन सौ.सारिकाताई गणेश काकडे यांनी केले आहे.

संपादक - डॉ. संदीप गाडेकर 

जाहिरात संपर्क - 8208185037

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर