जितेंद्र वळवी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
पुणे दि.21 प्रतिनिधी शिक्षण शास्त्र व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील सहयोगी प्राध्यापिका डॉ. निशा वळवी यांचे पती कै. जितेंद्र वळवी यांचे दिनांक 20 जलै 2024 रोजी पहाटे 1 वा. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी 20 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता झाला. त्यांची मुलीने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते त्यांनी यावेळी त्यांच्या पवित्र आत्म्यास श्रद्धांजली वाहिली. जितेंद्र वळवी यांच्या जाण्याने वळवी परिवारावर दुःखाचे संकट कोसळले आहे. वळवी परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो व त्यांच्या पवित्रा आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना शिक्षण क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी केली आहे. कै. जितेंद्र त्यांच्या पश्चात त्यांची आई, बहीण पत्नी व मुलगी असा परिवार आहे कै. जितेंद्र वळवी यांचा दशक्रिया विधी 29 जुलै 2024 रोजी औंध, पुणे या ठिकाणी होणार आहे.