वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

 


तळेगाव दाभाडे दि. १३ (प्रतिनीधी) दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड  अकाउंटंटस आॅफ  इंडिया कडून घेण्यात आलेल्या फायनल परिक्षेत तळेगाव दाभाडे येथील कु. वैष्णवी मखर हिन घवघवीत यश संपादन करुन मावळ तालुक्याचे नावलैकिकात  भर टाकली आहे . वैष्णवी हीने आपल्या कुशाग्र बुध्दीच्या जोरवार अनेक यशाची शिखरे पादाक्रांत केली आहे. माऊंट सेंट अॅन हायस्कूल तळेगाव दाभाडे येथे सन २०१६ ला ९७ टक्के मार्क मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला होता . तेव्हाच तीने सनदी लेखापाल (सी .ए.) होण्याचा मनोदय व्यक्त केला होता. सातत्य , जिद्द, चिकाटी, ध्येय व आत्मविश्वास यांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. ई. वाय.सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीत आर्टिकल शिप पूर्ण करून पुढे कार्पोरेट  क्षेत्रात  करीअर करण्याचा मनोदय तिने  व्यक्त केला. आपल्या यशाचे सर्व श्रेय ती आपल्या आई वडिलांना देते. 

वैष्णवीचे वडील लक्ष्मण मखर हे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे येथे गेली २७ वर्षं शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय मावळ तालुक्यातील विविध सामाजिक,सहकारी , शैक्षणिक संस्थांमध्ये विविध पदांवर काम करत असून ते उत्तम  संघटक आहेत. तर आई सौ. निलम मखर या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे येथे मुख्याध्यापिका म्हणून काम करत आहेत. तिच्या यशाबद्दल मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रातून तिचे विशेष अभिनंदन होत आहे.


Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर