ज्ञानार्जनासाठी उचललेले उपयुक्त पाऊल - डॉ. वसंत वाघ



पुणे दिनांक 24 (प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्थेतील केस्रो (KSRO )  ॲस्ट्रॉनॉमी  लॅबच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने या लॅबच्या माध्यमातून ज्ञानोपासना वाढीस लागणार असून सामाजिक उन्नतीच्या दृष्टीने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे ते म्हणाले...नेहमीच्या  साचेबद्ध शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक अभ्यासाकडे कल वाढवण्याचा हा विकसनशील प्रयोग असल्याचेही ते म्हणाले 

      या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कसलीही अडचण येऊ नये यासाठी सर्व सुविधायुक्त शिक्षण खडकी शिक्षण संस्थेमध्ये दिले जाते. त्याच प्रमाणे  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने काळाची गरज ओळखून आवश्यक त्या शिक्षण पद्धती संस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले. 

आपल्या मनोगतीय भाषणामध्ये हेंकेल इंडियाचे प्रोडक्शन मॅनेजर डॉ. प्रसाद खंडागळे, रिजनल मॅनेजर श्री. भूपेश सिंग, सी. एस. आर .श्री. रमित महाजन,संस्था सचिव श्री.आनंद छाजेड यांनी संस्थेमध्ये होत असलेल्या अमुलाग्र बदलांचे कौतुक केले. 

आपल्या प्रास्ताविका मध्ये संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे म्हणाले विद्यार्थ्यांनी केस्त्रो ॲस्ट्रॉनॉमी  लॅबचा पुरेपूर वापर करून नासा पर्यंत झेप घेऊन आपल्या संस्थेचे नाव मोठे करावे.

याप्रसंगी संस्था संचालक श्री. रमेश अवस्थी, ज्ञानेश्वर मुरकुटे, कार्यकारी अधिकारी डॉ. गजानन आहेर, मुख्याध्यापक घाडगे, सरिता नायर, संस्थेच्या सर्व विभागातील प्राध्यापक शिक्षक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बाळासाहेब थोरात यांनी तर आभार प्रदर्शन वैशाली वाघ यांनी व्यक्त केले.

जाहिरात व बातमिसाठी संपर्क 
डॉ. संदीप गाडेकर 
संपादक 
मोबाईल 820 818 50 37


Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश