पुस्तकांच्या सहवासात राहणारे कायम उच्च स्थान मिळवतात" - कृष्णकुमार गोयल

 

डावीकडून डॉ.संजय चाकणे, आनंद छाजेड, राजेंद्र भुतडा, डॉ.अर्जुन मुसमाडे, कृष्णकुमार गोयल, रमेश अवस्थे आणि आनंद नाईक

पुणे दि. 30 (प्रतिनिधी)"वाचन संकल्प महाराष्ट्राचा" या उपक्रमांतर्गत सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते "ग्रंथालय स्वच्छता अभियान" राबविण्यात आले प्रथमतः ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी माजी विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी ग्रंथालयातील 34000 अधिक ग्रंथांचा तसेच 27 नियतकालिके  आणि ग्रंथालयांची स्वच्छता व सर्वेक्षण केले. 

अध्यक्षस्थानी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी वाचकांशी संवाद साधताना आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये त्यांनी "जे वाचक पुस्तकांच्या सहवासात राहणारे असतात ते कायम उच्च स्थान मिळवतात" असे प्रतिपादन केले तसेच 1 जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025 या पंधरवड्यात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले, या उपक्रमानिमित्त खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंदी छाजेड रमेश अवस्थे राजेंद्र भूतडा प्राचार्य डॉ.संजय चाकणे डॉ.गजानन आहेर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल आनंद नाईक यांनी केले व तर आभार प्रदर्शन डॉ शैलेंद्र काळे यांनी केले.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 
डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास