राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे निबंध, वकृत्व स्पर्धा संपन्न



तळेगाव दाभाडे दि.28 (प्रतिनिधी) - सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ माता यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रवादी युवती काँग्रेस पुणे जिल्हा व राष्ट्रवादी युवती काँग्रेस मावळ तालुका आयोजित निबंध व वक्तृत्व स्पर्धा तळेगाव दाभाडे नगरपरिषद माध्यमिक शाळेत नुकतीच संपन्न झाली.



 या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्षा पायल देवकर, कुलस्वामिनी महिला मंच च्या संस्थापिका सारिका सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्षा दिपाली गराडे,अल्पसंख्यांक सेल अध्यक्षा शबनम खान, श्रद्धा शेळके, राष्ट्रवादी युवती काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष तेजस्विनी गरुड, राष्ट्रवादी युवती काँग्रेस मावळ तालुका कार्याध्यक्षा पूजा खराडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस तळेगाव शहराध्यक्षा प्रिया मोडक, राष्ट्रवादी युवती काँग्रेस लोणावळा शहराध्यक्षा पूर्वा गायकवाड ,राष्ट्रवादी युवती काँग्रेस वडगाव शहराध्यक्षा भाग्यश्री विनोदे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस देहू शहराध्यक्षा सुप्रिया पिंजन,मावळ तालुका युवती मोनिका येवले तालुका चिटणीस हर्षला शिंदे, तालुका सरचिटणीस शिवानी सोनवणे, तळेगाव कार्यध्यक्ष स्वप्ना कदम लोणावळा कार्याध्यक्षा संध्या घारे,गाव अध्यक्ष सदापूर,वैष्णवी शिंदे सोशल मीडिया (तळेगाव),ज्योत्स्ना शेळके उपाध्यक्ष (तळेगाव),वैष्णवी उबाळे उपाध्यक्ष (तळेगाव),प्रतिभा यशवंतराव वॉर्ड अध्यक्ष (तळेगाव),सृष्टी खैरे वॉर्ड अध्यक्ष तळेगाव या सर्व उपस्थित होत्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तळेगाव कार्याध्यक्ष शिवानी सोनवणे यांनी केलं . प्रास्ताविक सौ. पुजाताई खराडे व आभार प्रिया मोडक यांनी केलं.वकृत्व व निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून पल्लवी बीचे यांनी काम पाहिले. 


स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे -
वक्तृत्व स्पर्धा 
 प्रथम क्रमांक: अर्पिता सचिन चव्हाण (इयत्ता १०वी)
द्वितीय क्रमांक: कृष्णाली हरेंद्र पासवान (इयत्ता ९वी)
तृतीय क्रमांक: सूरज महाराजसिंग यादव(इयत्ता ९वी) व 
निबंध स्पर्धा 
प्रथम क्रमांक:रेणू सेवालाल चव्हाण (इयत्ता ९वी)
द्वितीय क्रमांक:रितिका शिवाजी सावंत (इयत्ता१०वी)
तृतीय क्रमांक:तनोज किरण खंडागळे (इयत्ता ९वी)

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश