टि. ज. महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आवाज राष्ट्रीय पातळीवर

 

पुणे दिनांक 30 (प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्था टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी,पुणे. राष्ट्रीय सेवा योजना विभाग चे स्वयंसेवक सध्या राष्ट्रीय पातळीवर आयोजित उपक्रमांमध्ये सहभागी होत आहे तसेच विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय पातळीवरील कॅम्प  साठी झालेली आहे.

नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प राजस्थान जयपूर येथे यावर्षीचा होत आहे. या कॅम्पसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत फक्त तीनच मुलींचे सिलेक्शन झालेले आहे या सिलेक्शन मध्ये आपल्या खडकी शिक्षण संस्थेची टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी व्हिक्टोरिया जोसेफ हिची निवड झालेली आहे. व्हिक्टोरिया जोसेफ ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प चे स्वयंसेवक म्हणून प्रतिनिधित्व करणार आहे.


 महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागासाठी पहिल्यांदाच अशा महाराष्ट्र बाहेरील राष्ट्रीय पातळीवर एनआयसी कॅम्पला निवड  आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची झाली आहे. सदर विद्यार्थिनीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य तथा खडकी शिक्षण संस्थेचे सहसचिव माननीय डॉ. संजय चाकणे यांनी सदर  विद्यार्थिनीचे अभिनंदन करून या कॅम्प साठी शुभेच्छा दिल्या. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी असेच स्वयंसेवकांना राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर,  महाविद्यालयीन पातळीवर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी झळकले पाहिजे असे मत व्यक्त केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर