Skip to main content
ताणतणावातून दिलासा देण्यासाठी विनोदी कलाकृतींची भूमिका मोलाची : डॉ. संदीप पाचपांडे गुलकंद चित्रपटातील कलाकारांचा एएसएम संस्थेतर्फे सत्कार
पिंपरी येथील एएसएम संस्थेच्या संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात 'गुलकंद' चित्रपटाच्या कलाकारांचा सत्कार करताना अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे आणि इतर मान्यवर
पिंपरी : ता. 28 (प्रतिनिधी) अध्ययन, अध्यापन आणि परीक्षेच्या ताणतणावातून दिलासा देण्यासाठी विनोदी कलाकृती मोलाची भूमिका बजावत आहेत. मराठी विनोदी चित्रपट आणि मालिकांची ही परंपरा प्रदर्शित होणारा 'गुलकंद' चित्रपट कायम राखेल, असा विश्वास औद्योगिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे यांनी सोमवारी (दि.28) व्यक्त केला.
पिंपरी येथील एएसएम संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकारांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दिग्दर्शक सचिन गोस्वामी, सह निर्माता सचिन मोटे विनोदी अभिनेते समीर चौघुले, प्रसाद ओक, अभिनेत्री ईशा डे आणि कलाकारांचा डॉ. संदीप पाचपांडे यांच्या हस्ते फुलरोपे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या विश्वस्त डॉ. प्रीती पाचपांडे, कलाकार शर्विल आगटे, दशरथ सिरसाठ आणि गणेश चौधरी, समन्वयक लक्ष्मीकांत गुंड आदी मान्यवर उपस्थित होते. 'गुलकंद' चित्रपट कुटुंब व्यवस्थेतील वास्तवावर भाष्य करणारा असून तो पाहिल्यानंतर थिएटरमधून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांना अनोखा अनुभव येईल, असा विश्वास समीर चौगुले यांनी यावेळी व्यक्त केला.

दिग्दर्शक गोस्वामी आणि अभिनेते प्रसाद ओक यांचीही यावेळी भाषणे झाली. गुलकंद मधून मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्यांना सामाजिक संदेश द्यायचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याने त्यांनी सांगितले. आपल्या आवडत्या मराठी कलाकारांना पाहून विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. त्यांच्या उत्साहास प्रतिसाद देत या कलाकारांनी चाहत्यांसोबत सेल्फी काढले.
टास्क फोर्सचे संचालक डॉ. दत्तात्रेय बाळसराफ यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. सीसीएसआयटीचे प्राचार्य डॉ. ललित कनोरे यांनी आभार मानले.
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.
Comments
Post a Comment