मनीषा दरेकर यांना पीएच.डी. पदवी

 



पुणे दि.२४ (प्रतिनिधी) महापालिका शाळा क्रमांक ५४ पिंपळे गुरव येथील मनीषा राजेंद्र दरेकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी शिक्षणशास्त्र या विषया अंतर्गत संशोधन केले आहे. 'मराठी वेगवान वाचन कौशल्य विकासासाठी सरावाधिष्ठित कार्यक्रमाची निर्मिती व परिणामकारकता" असा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यांना डॉ. विजय धामणे यांनी मार्गदर्शन केले.



मनीषा दरेकर या आंबेगाव तालुक्यातील नारोडी येथील रहिवासी असून नारोडी ग्रामस्थांच्या वतीने व राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल दरेकर यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.

 


Comments

Popular posts from this blog

व्ही .पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये तीन दिवसांसाठी “सॉफ्ट स्किल प्रोग्राम” चे यशस्वी आयोजन

सूक्ष्मजीवांचा अभ्यास म्हणजे भविष्याच्या प्रगतीचा मार्ग – प्राचार्य डॉ. संभाजी मलघे इंद्रायणी महाविद्यालयात जागतिक सूक्ष्मजीव दिन साजरा

अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथे ग्रंथालय दिन उत्साहात साजरा