विजयराव उभे यांची यशवंतराव ग्रामीण बिगर शेती पतसंस्थांच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड

 


वडगाव मावळ दि. 8 (प्रतिनिधी)- मावळ तालुक्यातील साते येथील यशवंत ग्रामीण बिगर शेती पतसंस्थांच्या चेअरमनपदी विजयराव उभे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
माजी चेअरमन नामदेवराव गाभणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी संस्थेच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये विजयराव उभे यांचा चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली 

यावेळी संस्थापक भाऊसाहेब आगळमे, माजी चेअरमन नामदेव गाभणे, संचालक सचिन आवटे, विजय शिंदे,प्रकाश आगळमे, मारुती आगळमे,लक्ष्मीबाई आगळमे,भरत आगळमे,संस्थापिका सुलभा गावडे, कँशियर संतोष शिंदे व सर्व संचालक मंडळ शुभेच्छा देण्यासाठी उपस्थितीत होते.


  


निवडीनंतर बोलताना विजय उभे यांनी सांगितले संस्थेच्या योजनाचा सभासदांना लाभ देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असुन असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन विजयराव उभे यांनी सांगितले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा