स्व.वामनराव हैबतराव देशमुख माध्यमिक विद्यालय मध्ये 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

 


तळेगाव दाभाडे दि. 21 (प्रतिनिधी) 21 जून  जागतिक योग दिनाचे औचित्य साधून स्वर्गीय वामनराव हैबतराव देशमुख माध्यमिक विद्यालय देवघर तालुका मावळ जिल्हा पुणे  या शाळेत विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात आले. विद्यालयातील योगा शिक्षक प्रवीणकुमार हुलावळे  यांनी सर्व विद्यार्थ्यांना योग्य आणि प्राणायाम याचे महत्त्व व इतिहास सांगून योग व प्राणायामाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली. 

विद्यार्थ्यांनी व शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी या प्रत्यक्षिकामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.बी.पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना 'योग' हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक व्हावा व स्वतःच्या आरोग्याबरोबर राष्ट्राचे आरोग्य समृद्ध करण्यासाठी आपण प्रत्येकाने नियमित योग अभ्यास केला पाहिजे'असे मार्गदर्शन केले. 



क्रीडा शिक्षिका मनीषा टिकेकर यांनी विद्यार्थ्यांना खेळाबरोबरच एकाग्रता आणि अभ्यास कौशल्य आत्मसात करण्यासाठी योग आणि प्राणायाम याचे महत्त्व सांगितले. सदर प्रसंगी विद्यालयातील शिक्षक श्री गायकवाड सर, कचरे सर क्षीरसागर सर यांनी योग प्रात्यक्षिकांमध्ये आपला सहभाग नोंदविला.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के