जागतिक योग दिना निमित्ताने सहज योग प्रतिष्ठान यांचे वतीने योग-ध्यान-प्राणायाम शिबिराचे आयोजन

 

पुणे दि. १८ (प्रतिनिधी) आज आपली योग पद्धती जगाने स्वीकारली आहे, त्यामुळे वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून 21 जून हा दिवस योग दिवस आंतराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. त्याच औचित्यावर  क्लस्टर B1 मध्ये योग दिवस साजरा होणार आहे. यामध्ये शास्त्रीय पद्धतीनुसार योग ध्यान, प्राणायाम यावेळी सहज योग प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.



 पंतप्रधानांनी जगाच्या कल्याणासाठी 27 सप्टेंबर 2014 ला संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात योगदिनाचा मुद्दा मांडला, 11 डिसेंबर 2014 ला मान्यता मिळाली आणि त्यानंतर 21 जून 2015 हा पहिला योगदिवस साजरा झाला, आजच्या दिवशी सर्वच जण योग अभ्यास करतात त्याच धर्तीवर आपण B1 क्लस्टर मध्ये कार्यक्रम आयोजित करावा असा अनेक महिला ,पुरुष यांची सूचना होती त्यानुसार आपण कार्यक्रम आयोजित केला आहे.



         सर्वानी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन सहज योग प्रतिष्ठान यांचे वतीने करण्यात आले आहे.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

व्ही .पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये तीन दिवसांसाठी “सॉफ्ट स्किल प्रोग्राम” चे यशस्वी आयोजन

कृष्णराव भेगडे फार्मसीला शैक्षणिक कामगिरीसाठी उत्कृष्ट दर्जा

व्ही.पी. एस. कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी लोणावळा या महाविद्यालयास नॅकचा B+ दर्जा प्राप्त