Skip to main content
नवीन समर्थ विद्यालयात मोठ्या उत्साहात योग दिन साजरा
तळेगाव दाभाडे दि. २१ (प्रतिनिधी ) आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्व जगभर साजरा केला जातो . २०१५ साली भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हा योग दिन सुरू केला.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली .या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्य वासंती काळोखे पर्यवेक्षक अर्चना शेडगे ज्येष्ठ अध्यापक शरद जांभळे शिक्षक प्रतिनिधी योगेश पाटील सर्व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी चे विद्यार्थी समर्थ देशमुख व ओम निकम या दोघांनी अतिशय उत्कृष्ट रीतीने केले .प्रास्ताविक शिल्पा पवार यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार करून योगासनाची सुरुवात केली.
आशा सातकर यांनी आपल्या मनोगतातून योग आपल्या जीवनात किती महत्त्वाचा आहे ,याबद्दल विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर विद्यार्थी मनोगत मध्ये श्रीहरी टिळेकर, सृष्टी होळकर वरद मेहकर सर्व विद्यार्थ्यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट केले. यानंतर विद्यार्थ्यांनी योगासनाची प्रात्यक्षिके केली .त्यांच्याबरोबर सर्व शिक्षक कर्मचारी यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला.
सुनील बोरुडे यांनी मुलांना योगाची काही प्रात्यक्षिके करून घेतली .अध्यक्ष भाषणात सौ वासंती काळोखे योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. शेवटी अनुराधा हुलावळे यांनी सर्व शिक्षक विद्यार्थी यांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पडण्यासाठी विद्यालयातील सर्व अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी मदत केली.
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay
Comments
Post a Comment