व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा




लोणावळा दिनांक 24 (प्रतिनिधी) व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे दि.२४ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तुकडी BSF-142 अंतर्गत NSS स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.



या निमित्ताने महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. NSS स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील क्रीडांगण व परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. यासोबतच द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी रिया कोळी व गोदावरी पवार यांनी जनजागृती मोहीम या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, पाण्याची बचत करावी, वृक्षारोपणाचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर जागरूकता निर्माण केली.



या कार्यक्रमासाठी संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजय भुरके, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री. भगवान आंबेकर, ॲड. संदीप अगरवाल, श्री. नितीन गरवारे व श्री. स्वप्नील गवळी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर यांच्या प्रेरणेमुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.



कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. हरीश हरसुरकर, प्रा. हुसेन शेख, प्रा. सोनी राघो, प्रा. सायली धरणे, प्रा. प्रिती चोरडे, प्रा. किरण शारीकर, प्रा. तनुजा हुलावळे, प्रा. सुनिल परगे, प्रा. नम्रता जंगम, प्रा. अमिषा नाईक, प्रा. अनुप देशमुख, प्रा. श्रीकांत घाटगे, प्रा. मोनाली देशमुख, प्रा. मानसी बसुतकर, प्रा. पूजा पाटील, प्रा. श्रद्धा पुजारी, श्री. पराग मराठे, श्री. नंदू ठाकर, श्री. स्नेहल कुटे, श्री. वैभव कापसे, श्री. रघुनाथ शेडगे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा