Posts

Showing posts from September, 2022

मुंढवा शिवाजी चौकातील मगरपट्टा रोडवरील नित्याच्याच वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त: नाहक सोसावा लागतोय त्रास

 पुणे, मुंढवा,दि. 28 सप्टेंबर 2022 मुंढवा  शिवाजी चौकातील मगरपट्टा रोडवरील नित्याच्याच वहातूक  कोंडीने नागरिक त्रस्त: नाहक सोसावा लागतोय त्रास.     मुंढवा मगर पट्टा रोडवरील शिवाजी चौकातील वाहतूक कोंडी आता नित्याचीच झालेली आहे.चौकाच्या दोन्ही बाजूने प्रचंड प्रमाणात वाहनांच्या रोज लांबच्या लांब रांगा लागत आहेत. यामूळे नागरिकांना बऱ्याच वेळा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चंदननगर ते हडपसर हा मगरपट्टा रोड अतिशय वर्दळीचा आहे. या मार्गाने पुढे विमाननगर चंदन नगर, खराडी या परिसरातील अनेक आयटी कंपन्या तसेच सणसवाडी व रांजणगाव या औद्योगिक क्षेत्रात कामानिमित्त हजारो लोक या रस्त्याने प्रवास करत असतात. शक्यतो सकाळी नऊ ते अकरा व संध्याकाळी सात ते नऊ या वेळात प्रचंड प्रमाणात या चौकांमध्ये वाहतूक कोंडी होते.     चौक पूर्णपणे अतिक्रमणाने वेढलेला असून चौकाच्या दोन्ही बाजूला अतिशय निमुळता रस्ता आहे. तसेच चौकातून केशवनगर कडे उजव्या बाजूने वळण घेताना सिग्नलला फक्त दहा सेकंद मिळतात या मध्ये फक्त दोनच वहाने जाऊ शकतात त्यामुळे प्रचंड प्रमाणात पाठीमागे वाहनांच्या रांगा लागतात....

श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या

Image
 तळेगांव स्टेशन दि.28 आदरणीय सल्लागार मंडळ संचालक मंडळ निमंत्रित संचालक मंडळ दैनंदिन बचत प्रतिनिधी कर्मचारी वृंद यांना कळविण्यात येते की, आपल्या श्री डोळसनाथ नागरी सहकारी पातसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.३० वाजता हॉटेल ईशा, खांडगे पेट्रोल पंपा जवळ, तळेगांव दाभाडे येथे होणार आहे. या कार्यक्रमात आपले सर्वांचे श्रद्धास्थान सहकार नेते तथा पतसंस्थेचे संस्थापक माननीय बबनभाऊ  भेगडे साहेब यांना सहकार क्षेत्रातील गेली ३० वर्षे हून अधिक भरीव योगदानाबद्दल/कार्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने कार्यक्रमात मान्यवर पाहुणे यांचे शुभ हस्ते"सहकार भूषण" कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून ख्यातनाम साहित्यिक, जेष्ठ विचारवंत लेखक तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी, आदरणीय डॉ विश्वास पाटील सर उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचे विचार ऐकण्याची संधी आपणा सर्वांना मिळणार आहे.  तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास आपले सहकारी मित्र परिवार यांचे सह उपस्थित रहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.

प्रा. संतोष थोरात व प्रा. सचिन दुर्गाडे पुणे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Image
 प्रा. संतोष थोरात व प्रा. सचिन दुर्गाडे  पुणे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित  पुणे,26 सप्टे.2022 , पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने  जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे आयोजन अण्णाभाऊ साठे सभागृह पद्मावती पुणे याठिकाणी करण्यात आलेले होते यावेळी आनंद विद्यानिकेतन हायस्कूल विमान नगर चे विद्यार्थी प्रिय इंग्रजीचे अध्यापक संतोष थोरात तसेच एस एम जोशी हिंदी माध्यमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षक मा.सचिन दुर्गाडे  यांना  महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव माननीय दीपक शेलार साहेब, भाषण कला प्रशिक्षक शशांक मोहिते व पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे मॅडम यांच्या हस्ते देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले.  संतोष थोरात गेले वीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून यांनी पाच विषयात एम.ए तसेच एम.एड.एम.फिल केलेले असून शालेय व्यवस्थापन तसेच पत्रकारिता या विषयांमध्ये पदविका मिळवलेली आहे. त्यांनी इंग्रजीच्या तीन पुस्तकांचे लेखन केले आहे त्यापैकी दोन पुस्तके प्रकाश...

दौंड तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

Image
  दौंड तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न पुणे रविवार दि. 25 दौंड येथील  पवार पॅलेस सोनवडी दौंड येथे  दौंड तालुका माध्यमिक शिक्षक संघ/महिला शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या वतीने तालुका स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार  गुणगौरव सोहळा मा.आमदार व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री रमेश आप्पा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली  व भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री.वासुदेव काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री.आप्पासाहेब पवार, सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव, हरिभाऊ ठोंबरे, उत्कर्ष शिक्षण संस्थेचे सचिव श्री.सचिन शितोळे,राज्य टि.डी.एफचे कार्याध्यक्ष,जी.के थोरात शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष, वसंतराव ताकवले , मुरलीधर मांजरे, पंचायत समितीचे मा.उपसभापती, नितीन दोरगे,कुंडलीक खुटवड,सोनवडी गावचे,सरपंच, अमोल पवार, उपसरपंच,रंजना खोमणे,भीमा पाटसचे संचालक, तुकारामअवचर मुख्याध्यापक संघाचे,अरुण थोरात, आदिनाथ थोरात, प्रसाद गायकवाड, रामचंद्र नातू आजी माजी मुख्याध्यापक सर्व शिक्षक बंधूभगिनी आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. ...