प्रा. संतोष थोरात व प्रा. सचिन दुर्गाडे पुणे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 प्रा. संतोष थोरात व प्रा. सचिन दुर्गाडे  पुणे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित


 पुणे,26 सप्टे.2022 ,

पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने  जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे आयोजन अण्णाभाऊ साठे सभागृह पद्मावती पुणे याठिकाणी करण्यात आलेले होते यावेळी आनंद विद्यानिकेतन हायस्कूल विमान नगर चे विद्यार्थी प्रिय इंग्रजीचे अध्यापक संतोष थोरात तसेच एस एम जोशी हिंदी माध्यमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षक मा.सचिन दुर्गाडे  यांना  महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव माननीय दीपक शेलार साहेब, भाषण कला प्रशिक्षक शशांक मोहिते व पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे मॅडम यांच्या हस्ते देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले.

 संतोष थोरात गेले वीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून यांनी पाच विषयात एम.ए तसेच एम.एड.एम.फिल केलेले असून शालेय व्यवस्थापन तसेच पत्रकारिता या विषयांमध्ये पदविका मिळवलेली आहे. त्यांनी इंग्रजीच्या तीन पुस्तकांचे लेखन केले आहे त्यापैकी दोन पुस्तके प्रकाशित झालेली असून तिसरे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. तसेच सध्या ते पुणे विद्यापीठामध्ये पीएच. डी.चे संशोधनाचे  कार्य करत आहेत. आजपर्यंत त्यांना अनेक सामाजिक पुरस्काराने सन्मानित केले असून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून शालेय गुणवत्ता वाढीसाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.कोरोणात शाळा आपल्या दारी हा उपक्रम राबवून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन प्रवेश दिला, शाळा सुशोभिकरण विद्यार्थी शिस्त व गुणवत्ता वाढीसाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. कोरोणा काळात विनाअनुदानित  शिक्षकांसाठी एक हात मदतीचा हा उपक्रम राबवून टीडीएफ च्या माध्यमातून अनेक शिक्षकांना त्यांनी आर्थिक मदत मिळवून दिली. सध्या ते पुणे शहर टीडीएफचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. 

  प्रा. सचिन दुर्गाडे हे पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघ संघाचे अध्यक्ष व आंतरभारती पुणे चे उपाध्यक्ष असुन अनेक सामाजिक संस्थांशी जोडलेले आहेत. या संस्थांच्या माध्यमातून युवा व्यक्तित्व शिबीर, पर्यावरणीय जनजागृती व बालसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ते राबवत असतात सध्या एस. एम. जोशी हिंदी माध्यमिक विद्यालय मध्ये ते 18 वर्षापासून अध्यापन कार्य करत आहेत नुकताच त्यांना महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा विद्यालयाच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य प्र. द. पुराणिक  गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. 

दोन्ही  मान्यवरांना   जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल  शहर  जिल्ह्यातून दोघांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.   

 यावेळी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव माननीय दीपक शेलार यांनी आपल्या मनोगतामध्ये शिक्षक हा समाजाचा कणा असून समाजाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकाचे मोलाचे योगदान आहे असे मत व्यक्त केले. तसेच सुनंदा भाकरे मॅडम यांनी शैक्षणिक क्षेत्रात पुणे जिल्हा आघाडीवर असल्याचे प्रतिपादन केले तसेच शिक्षकांचे वेतन व इतर सोयी सुविधा देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये शिक्षण विभागाच्यावतीने प्रयत्नशील राहणार असल्याचे मत व्यक्त केले.

 सदर पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माननीय नंदकुमार सागर सर ,सचिव मा. प्रसाद गायकवाड, माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, कार्याध्यक्ष मधुकर नाईक, विभागाचे सचिव शांताराम पोखरकर, राज्याचे माजी सचिव आदिनाथ थोरात सर, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुजित जगताप शिवाजीराव कामथे , शिरूर चे माजी आमदार सूर्यकांत काका पालांडे  तसेच जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी व  शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे नियोजन पुणे शहर माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. शिवाजीराव कामथे सर व शिवाजी शिंदे सर यांनी केले तर सर्व मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रसाद गायकवाड सर यांनी मानले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश