दौंड तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न


 

दौंड तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न


पुणे रविवार दि. 25 दौंड येथील 

पवार पॅलेस सोनवडी दौंड येथे दौंड तालुका माध्यमिक शिक्षक संघ/महिला शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या वतीने तालुका स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

 गुणगौरव सोहळा मा.आमदार व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री रमेश आप्पा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली  व भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री.वासुदेव काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री.आप्पासाहेब पवार, सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव, हरिभाऊ ठोंबरे, उत्कर्ष शिक्षण संस्थेचे सचिव श्री.सचिन शितोळे,राज्य टि.डी.एफचे कार्याध्यक्ष,जी.के थोरात शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष, वसंतराव ताकवले , मुरलीधर मांजरे, पंचायत समितीचे मा.उपसभापती, नितीन दोरगे,कुंडलीक खुटवड,सोनवडी गावचे,सरपंच, अमोल पवार, उपसरपंच,रंजना खोमणे,भीमा पाटसचे संचालक, तुकारामअवचर मुख्याध्यापक संघाचे,अरुण थोरात, आदिनाथ थोरात, प्रसाद गायकवाड, रामचंद्र नातू आजी माजी मुख्याध्यापक सर्व शिक्षक बंधूभगिनी आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

      कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलनाने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी आपल्या भाषणात सदर पुरस्कार वितरण समारंभ गेली सतरा वर्षे शिक्षक संघटनेच्यावतीने सुरू आहे,असे सांगून पी.डी.सी.सी.बॅंकेने शिक्षकांच्या कॅश क्रेडिट मध्ये केलेली वाढ,व व्याजदरात कपात केली म्हणून रमेश थोरात यांचे आभार मानले.यानंतर जी.के.थोरात यांनी आपल्या भाषणात सरकारच्या बदलत्या धोरणामुळे शिक्षण संस्था, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.संघटनेच्या माध्यमातून काम सूरू असले तरी संघटनेचा आमदार नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.असे सांगितले.यानंतर

   वासुदेव काळे आपल्या भाषणात म्हणाले, राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे , शिक्षकांच्या प्रति मला आदर आहे,शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम आपल्यासोबत राहील, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.शेवटी अध्यक्षीय भाषणात रमेश थोरात म्हणाले जिल्हा बॅंक सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी काम करत आली आहे तसेच आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी बॅंकेच्या धोरणांमध्ये काही बदल केले आहेत.पुरस्काराचे १८वे वर्ष आहे, याचा अर्थ संघटनेचे संघटन उत्कृष्ट आहे,असा होतो.शेवटी त्यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष,वसंतराव ताकवले, मुरलीधर मांजरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी राजेंद्र जगताप, नामदेव खडके, गणेश होले,वैशाली खिंवसरा,काका ढवळे यांचा जिल्हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

  तसेच या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य करणारे पवार पॅलेसचे मालक उत्तमराव पवार,घाडगे पाटील मंडप डेकोरेटरचे मालक, अंकुश घाडगे, सोमनाथ ताकवणे, नितीन प्रेस,यांचाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला

       पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे विलास कदम,(शारदा विद्यालय,सहजपुर.) दत्तात्रय चोरमले,(आदर्श विद्यालय,वडगावबांडे)नामदेव निकम,(श्रीम.रं गु.कटारिया वि.बोरिबेल) गुलाब घिगे(न्यू इंग्लिश स्कूल, पारगाव) शामराव गोरगल(जवाहरलाल वि.केडगाव)सौ.शारदा लोणकर (गोपीनाथ वि.वरवंड)श्रीम.माधुरी खांडेकर (श्री फिरंगाईमाता वि.कुरकुंभ) राजेंद्र जाधव(राजेश्वर विद्यालय,राजेगाव)सौ.अश्विनी शेलार,(काकासाहेब थोरात,धायगुडेवाडी)सतिश सोनवणे(भैरवनाथ वि.वायरेसफाटा)सचिन शेलार (भैरवनाथ विद्यालय,सोनवडी) शिवाजी काळे(सिद्धेश्वर वि.दे.राजे) श्रीकृष्ण नरवडे (कै.भाऊसाहेब भागवत वि.माळेवाडी)श्रीम.मनिषा टेकवडे (गुरुकृपा वि.वासुंदे) शुभांगी मोरे (राज्य रा.पोलीस पब्लीक माध्य.वि.दौंड)शारदा गायकवाड (कै.त्र्यिंबक दिवेकर वि.कडेठाण) मिलिंद लोणकर (शेठ जोतीप्रसाद वि.दौंड) बापुराव धुमाळ(भैरवनाथ वि.मळद)कैलास काशिद (स्व.लाजवंती गॅरेला वि.दौंड) सोमनाथ लवंगे (वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वि.दौंड) शिवाजी दोरगे (भैरवनाथ माध्य.वि.खुटबाव)आणि उपक्रमशील शाळा (ज्ञानराज शिक्षण संस्था, खामगाव.)

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, सुनील ताकवणे ,राजेंद्र जगताप, नामदेव खडके ,संजय चव्हाण,आर.के.शितोळे,महेंद्र भोसले, रावसाहेब डोंबे,संतोष दोरगे,विठ्ठल खामकर, सुभाष कदम, मिलिंद टेंगले, विलास थोरात,लालासो साळवे,नाना डुकरे, मुकुंद भिसे,राजेंद्र रंधवे,आदींनी प्रयत्न केले.तसेच रांगोळीकार सुभाष फासगे यांच्या रांगोळीने व न्यू इंग्लिश स्कूल पारगावच्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल ताकवणे, नामदेव खडके,बी.डी.शितोळे यांनी केले,तर आभार संजय वाबळे यांनी मानले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश