सहकारभूषण मा .श्री. बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त हरणेश्वर टेकडी येथे वृक्षारोपण



तळेगाव दाभाडे दि. २० (संपादक - डॉ.संदीप गाडेकर ) मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मा.अध्यक्ष /पुणे पीपल्स बँकेचे मा अध्यक्ष विद्यमान संचालक सहकारभूषण मा.श्री.बबनराव भेगडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे त्यांनी ठरवले होते.वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम न घेता वृक्ष  संवर्धनसाठी त्यांनी हरणेश्वर टेकडी तळेगाव स्टेशन येथे वृक्षारोपन केले.या ठिकाणी विविध वृक्षांचे वृक्षारोपण तालुक्यातील त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मान्यवरांसोबत व उपस्थित कार्यकर्त्यांसोबत  केले.या वेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी मावळ लोकसभेचे खासदार  श्रीरंग अप्पा बारणे ,लोकसभेचे इच्छुक  उमेदवार संजोग वाघेरे ,बापूसाहेब भेगडे,गणेशजी खांडगे, गणेश भेगडे ,बबनराव भोंगाडे ,सुरेशभाऊ धोत्रे, रवींद्र  भेगडे ,गणेश काकडे ,संतोष भेगडे,संतोष मुऱ्हे ,कैलास हुलावळे,अंकुश आंबेकर ,अतुल  राऊत , ,दत्तात्रय पडवळ,संजय खांडेभरड,गणेशअप्पा ढोरे , विकास  कंद ,शिवाजी टिळेकर ,कृष्णा दाभोळे ,प्रवीण झेंडे ,अभिजित काळोखे ,शिवाजी असवले ,शरद भोंगाडे,किशोरभाऊ  भेगडे सुनील दाभाडे,नंदकुमार कोतूळकर,सुनीलअण्णा भोंगाडे,सुभाष जाधव,राहुल पारघे,दर्शन खांडगे ,रामभाऊ गवारे,विक्रम  कदम ,आशिष खांडगे ,निलेश राक्षे ,नामदेव शेलार,शरद हुलावळे ,मिकी कोचर,विशाल वाकडकर,विठ्ठलराव शिंदे ,शैलजाताई काळोखे ,दिपालीताई गराडे तसेच  तळेगाव व चाकण एम .आय .डी.सी  मधील कंपन्यांचे  प्रतिनिधी सहकार क्षेत्रातील अधिकारी,मावळ तालुक्यातील पत्रकार बंधू  व श्री  डोळसनाथ नागरी सह पतसंस्थचे सर्व संचालक मावळ  तालुक्यातील विविध राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या  संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर