अध्यापक महाविद्यालयात प्रथम वर्ष बी. एड. आणि एम. एड. ‘स्वागत समारंभ’ संपन्न

 



 वडगाव मावळ दि. ४ (प्रतिनिधी) श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय, वडगाव मावळ दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ‘स्वागत समारंभाचे (Induction Programme)’ आयोजन करते. या कार्यक्रमातून महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या गुणवत्तापूर्ण कार्यप्रक्रीयेच्या परंपरेची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली जाते. शैक्षणिक वर्ष २५ -२६  मध्ये हा कार्यक्रम ४ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा करण्यात आला. 

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता धायगुडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना महाविद्यालयीन कार्यप्रणालीची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील योजनाची रूपरेषा मांडली. दीपप्रज्वलन आणि प्रतीमा पुजनानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी धनश्री चौधरी यांनी स्त्री शक्ती आणि शिक्षकाची भविष्यातील भूमिका यांची सांगड घालत संत परंपरेची समकालीन गरज अधोरेखित केली. यानंतर कार्येक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे ‘अंबर’ साप्ताहिकाचे संपादक सुरेशजी साखवळकर यांनी भारतीय ज्ञान परंपरेची कास धरणे सद्यस्थितीत किती आवश्यक आहे हे त्यांच्या आयुष्यातील विविध अनुभवांचा उल्लेख करताना विद्यार्थ्यांवर बिंबवले. त्यांनी सुश्राव्य अभंग गायनातून सर्वाना भारावून टाकले. 




सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक परीक्षेत महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या  निकिता मावळे (बी.एड.),  प्राजक्ता ढोरे (बी.एड.) आणि प्रियांका बहिरट (एम.एड.),  या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. प्रथम वर्ष बीएड प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पेन देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. संस्थेचे संचालक सदस्य राज खांडभोर यांनी विद्यार्थ्याना उत्तम मार्गदर्शनाची हमी व शुभेच्छा दिल्या. 

अध्यक्षीय मनोगतात श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा.अशोकजी बाफना यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी अद्ययावत राहण्याची गरज समजावून सांगताना महाविद्यालयातून पुढील २ वर्षांच्या वाटचालीत महाविद्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या सहकार्य व पाठिंब्याची हमी दिली. 



         कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सचिव अशोक बाफना, सदस्य प्रल्हाद जांभुळकर, चंद्रकांत ढोरे, दत्ताभाऊ असवले, राजेश बाफना,राज खांडभोर उपस्थित होते.


महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक महादेव सांगळे, सह. प्रा.डॉ.कविता तोटे, सह.प्रा. डॉ.संदीप गाडेकर,सह.प्रा. शीतल देवळालकर सहा. प्रा. ज्योती रणदिवे,सहा.प्रा. सोनाली पाटील-महाजन, सहा.प्रा. शबाना मोकाशी,  डॉ. दीपा नेवसे, सहा. प्रा. संध्या घोडके,  ग्रंथपाल सुजाता जाधव-गंभीरराव, प्राध्यापकेतर कर्मचारी मोहन कडू, सुरेश  घोजगे, नंदकिशोर मुगेरा, विनायक येळवंडे, संतोष ढमाले, सोमनाथ धोंगडे यांनी सहकार्य केले. बी.एड.द्वितीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास सहकार्य करताना उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 



     संस्थेचे संस्थापक माजी मंत्री श्री मदनजी बाफना साहेब, संस्थेचे अध्यक्ष मा. तुकाराम असवले आणि संस्थेचे उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सचिव अशोक बाफना यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रथम वर्ष बी.एड. वर्गशिक्षक सह.प्रा. डॉ.शीतल देवळालकर आणि सहा .प्रा. ज्योती रणदिवे यांनी केले. द्वितीय वर्ष विद्यार्थी नेहा खानेकर आणि दर्शना सकटे यांनी उत्तम सूत्रसंचालन केले. 
प्रथम वर्ष एम.एड. च्या वर्गशिक्षक सहा.प्रा. डॉ. अनामिका कावरे यांनी सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा