ज्ञानाची ज्योत पेटवून महात्म्यांची जयंती साजरी

 

आळंदी दि.१४ (प्रतिनिधी): माईस, एमआयटी संत ज्ञानेश्वर बी.एड. कॉलेजमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही संयुक्त रीतीने महाविद्यालयात साजरी झाली. या निमित्ताने विद्यार्थी -शिक्षकांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. यामध्ये महात्मा फुले यांनी समाज सुधारण्यासाठी केलेल्या विविध कार्याचा आढावा घेण्यात आला यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना, स्त्री शिक्षणासाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक कार्य याविषयी विद्यार्थी - शिक्षकांनी आपले मते मांडली. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज उद्धारासाठी केलेले कार्य, भारतीय संविधानाद्वारे रचलेला इतिहास याबद्दल विस्तृत माहिती देण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी या महात्म्यांच्या जयंती साजरी करण्यासाठी शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे स्पष्ट करत भारतीय परंपरा, संस्कृती आणि इतिहास यांचे जतन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी "ज्योत से ज्योत जलाओ" हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आणि शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रांमध्ये प्रवेश करत असताना ज्ञानाची कास धरून समाजाच्या उद्धारासाठी आपली जबाबदारी किती महत्त्वाची आहे याबद्दलचे वचन घेतले. सर्व विद्यार्थ्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत खीर वाटप करून कार्यक्रमाची गोड सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ, डॉ. प्रतिभा दाभाडे, प्रा. अंगद जावळे, डॉ. गंगोत्री रोकडे, डॉ. विकास तुपसुंदर, प्रा. शेखर क्षीरसागर, प्रा. दर्शना पवार, प्रा. संदीप गाडीकर, श्री. संतोष सांगळे, श्री. सुनील कांबळे व श्री. महावीर सोनपेठकर या सर्व शिक्षक शिक्षकेतर वर्गाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  गीतांजली काळे आणि ऋतुजा वाघमोडे तसेच कार्यक्रमाचे आभार संतोषकुमार पंडित यांनी केले.

संपादक - डॉ.संदीप गाडेकर 

जाहिरात व बातमीसाठी संपर्क - 8208185037


Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश