व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी लोणावळाच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांची आंतरराष्ट्रीय परिषद गोवा येथे उपस्थिती

 


लोणावळा दि. 15 (प्रतिनिधी)व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी लोणावळाच्या  महाविद्यालयातील प्राध्यापकांनी 9 ऑगस्ट 2024 रोजी ICT for Sustainable Developmentt (ICT4SD) वरील 9 व्या आंतरराष्ट्रीय  परिषदेला गोवा येथे  हजेरी लावली.
अनेक विद्वानांनी पॅनेल सत्रांमध्ये भाग घेतला, लेखक आणि सह-लेखन पेपर सादर केले आणि संपूर्ण कॉन्फरन्समध्ये रचनात्मक अभिप्राय प्रदान करणारे चर्चाकार म्हणून काम केले.  
महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. मानव अ. ठाकूर, डॉ. हरीश हरसूरकर (Mech HOD), प्रा. हुसेन शेख (Applied Science HOD) आणि इतर महाविद्यालयीन प्राध्यापकांनी मशीन लर्निंग, ऑटोमोबाईल, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्ट्रक्चरल डिझाईन यासह विविध विषयांमध्ये आपल्या महाविद्यालयाने अकरा पेपर प्रकाशित करून आपले योगदान दिले. 
 त्याबददल त्यांचे कौतुक संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाहक डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाहक श्री. विजय भुरके, नियामक मंडळाचे सभासद श्री. भगवान आंबेकर, अँड. संदीप अगरवाल, श्री नितीन गरवारे, श्री स्वप्निल गवळी तसेच सर्व सभासदांनी आणि महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांनी शुभेच्छा दिल्या.

बातमी व जाहिरात संपर्क 
डॉ. संदीप गाडेकर 
संपादक 
मोबाईल नंबर 820 818 50 37

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश