१९ वर्षाखालील शालेय तालुकास्तरीय मुलांच्या खो-खो स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयास उपविजेतेपद

 


तळेगाव दाभाडे दि.२५ (प्रतिनिधी)  २३ ऑगस्ट रोजी जैन इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे झालेल्या पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील अटीतटीच्या सामन्यांमध्ये मुलांच्या संघाने चांगल्या रीतीने कामगिरी करून उपविजेते पद भूषविले.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे, संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, तसेच उपप्राचार्य संदीप भोसले यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून कौतुक केले  व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खेळाडूंना क्रीडा शिक्षिका प्रा. प्रतिभा गाडेकर व गोरख काकडे यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात व बातमीसाठी संपर्क 
डॉ. संदीप गाडेकर 
संपादक 
मोबाईल नंबर- 820 818 50 37

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश