पीएम श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम

 

तळेगाव स्टेशन दि. ६ (वार्ताहर) 

शालेय क्रीडा विभाग, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा (DSO) जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे पार पडल्या. या स्पर्धेत संपूर्ण तालुक्यातील 55 ते 60 प्राथमिक व माध्यमिक शाळांनी सहभाग नोंदवला होता. या क्रीडा स्पर्धेत  पीएमश्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक 6 यांनी क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन तालुकास्तरीय 14 वर्षाखालील मुलींचा खो-खो गटात तुळजाभवानी विद्यालय सोमाटणे यांचा 1 डाव व 6 गुणांनी पराभव करून तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मोठ्या गटातील 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल तळेगाव दाभाडे या संघाचा दोन गुणांनी पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला.

            सर्व खेळाडूंचे शिल्पाताई रोडगे  प्रशासनाधिकारी अधिकारी तळेगाव दाभाडे, मुख्याध्यापक  केशव चिमटे, Asking प्रमुख मार्गदर्शक सुनील जगताप सर, किरण तळपे, कार्तिक मोरे, व सर्व सहकारी शिक्षक यांनी  कौतुक करून शाब्बासकी दिली.

जाहिरात व बातमीसाठी संपर्क 
डॉ. संदीप गाडेकर 
संपादक 

मोबाईल नंबर 820 818 50 37



Comments

Popular posts from this blog

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के