अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची उत्साहात सांगता



तळेगाव दाभाडे दि. 18 (संपादक - डॉ.संदीप गाडेकर )

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश मोहनराव काकडे यांच्या सहकार्याने श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर समर्थ नगर डी पी रोड तळेगाव दाभाडे (स्टेशन) या ठिकाणी  अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन दिनांक 9 ते 16 डिसेंबर या दरम्यान केले होते.



 यामध्ये सोमवार दिनांक 16 डिसेंबर रोजी सप्ताहाचा शेवटचा दिवस होता श्री स्वामी समर्थांची आरती तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष गणेश काकडे तसेच त्यांच्या पत्नी सौ सारिका काकडे यांनी केली. आरती नंतर गणेश काकडे यांनी उपस्थित भाविक भक्तांना  मार्गदर्शन केले.



 आपल्या जीवनातील स्वामी सेवेचे महत्त्व सांगत असताना विविध उदाहरणे दाखले यावेळेस त्यांनी दिले. आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी स्वामी सेवेचे महत्त्व त्यांनी सांगितले. गणेश काकडे यांच्या सहकार्यातूनच  स्वामी सप्ताह यशस्वीरित्या पार पडला यासाठी स्वामी भक्तांनी गणेश काकडे यांच्या आभार मानले. त्यानंतर आलेल्या सर्व भाविक भक्तांनसाठी जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील हजारोंच्या संख्येने लोकांनी या उत्सवात सहभाग घेतला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

बातमी व जाहिरात संपर्क 
डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो. 8208185037


Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश