नवीन मतदार नाव नोंदणी अभियाना सुरुवात


तळेगाव दाभाडे दि. २१ (प्रतिनिधी) तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीतील श्री गणेशभाऊ मोहनराव काकडे माजी उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून सर्व नागरिकांसाठी सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 ते शनिवार दिनांक 25 जानेवारी 2025 पर्यंत सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये वतन नगर, सोमवारी भारत माता उद्यान हॉल, मंगळवारी इंद्रायणी कॉलनी सप्तशृंगी हॉल, बुधवारी सत्यकमल व विद्याविहार कॉलनी, गुरुवारी आनंद नगर गो.नी. दांडेकर उद्यान हॉल, शुक्रवार मनोहर नगर वरात विनायक मित्र मंडळ हॉल, शनिवार सिद्धार्थ नगर जोशी वाडी व ठाकरवाडी या ठिकाणी पुढील योजना मोफत पणे घेण्यात येणार आहेत.



नवीन मतदान कार्ड काढून देणे, मतदान कार्ड ट्रान्सफर करणे, मतदान कार्ड मध्ये नाव व पत्ता चेंज करणे, आयुष्यमान भारत पाच लाख विमा काढणे, ई -श्रम कार्ड काढून देणे,

यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रेशनिंग कार्ड शाळा सोडलेला दाखला लाईट बिल किंवा रेशनिंग कार्ड , फोटो व जन्माचा दाखला आवश्यक आहे.

तरी प्रभागातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक रोहित महादू लांघे व माजी उपनगराध्यक्ष  गणेशभाऊ मोहनराव काकडे यांनी केले आहे.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा