अॕड्. पु. वा.परांजपे विद्या मंदिरात अपूर्व विज्ञान मेळावा व पालक सभा कार्यक्रम उत्साहात संपन्न

 

तळेगाव दाभाडे दि.१६ (प्रतिनिधी) अॕड्. पु. वा.परांजपे विद्या मंदिरात अपूर्व विज्ञान मेळावा व पालक सभा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . याप्रसंगी प्रमुख पाहुणे ॲड.परांजपे विद्या मंदिराचे 1977 बॅचचे माजी विद्यार्थी  सुदाम दाभाडे यांच्या शुभहस्ते थोर शास्त्रज्ञ, मिसाइल मॅन, भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, सी. व्ही.. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन व अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन संपन्न झाले. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी विज्ञान व गणित विषयाचे एकूण शंभर प्रकल्प तयार केले होते. अपूर्व विज्ञान मेळाव्याचे औचित्य साधत विज्ञान विषयाला अनुसरून कलात्मक रांगोळी दालन, सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले होते. या प्रसंगी सुदाम दाभाडे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी चे अध्यक्ष मिलिंद शेलार, ओमकार वर्तले, अंकुश गुंड, गणेश लोंढे व पालक मोठया संख्येने अपूर्व विज्ञान मेळाव्यासाठी उपस्थित होते.


प्रशालेचे कार्यकुशल मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेतील भौतिक सोयी सुविधा, शालेय शिस्त, विद्यार्थ्यांची शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील कुस्ती स्पर्धेतील ईश्वरी झिंजुरके व अस्मी लोणारे यांनी केलेली दैदिप्यमान प्रगती , डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड च्या माध्यमातून झालेला कायापालट अपूर्व विज्ञान मेळावा आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. उपस्थित प्रमुख पाहुणे व पालकांनी बालचमूंनी तयार केलेल्या प्रकल्पांची व रांगोळी दालनाची पाहणी करून कौतुकाची व शाबासकीची थाप दिली. संस्थेचे अध्यक्ष  संजय तथा बाळा भेगडे, उपाध्यक्ष श्री गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार   राजेश म्हस्के, सहसचिव व शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार व सर्व संचालक मंडळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. 


प्रमुख पाहुणे  सुदाम दाभाडे यांनी आपल्या मनोगतातून शाळेचा झालेला कायापालट त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांच्या चिकित्सक व जिज्ञासू वृत्तीला वाव देऊन भविष्यकाळात वैज्ञानिक व भारताचे सजग नागरिक तयार होण्यासाठी गुरुजनांची मार्गदर्शकाची भूमिका स्पष्ट केली. विज्ञान हा केवळ विषय नसून तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे लक्षात घेत नाविन्याचा ध्यास धरण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा  काळडोके यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका रेखा भेगडे  यांनी केले. अपूर्व विज्ञान मेळावा यशस्वी करण्यासाठी नाजुका सोनकांबळे, विजय मुळे, सुवर्णा काळडोके , रजनी बधाले, प्रिया कांबळे, कविता पाखरे,गायञी जगताप, सुषमा दाते ,सुजाता कातोरे, प्रभा काळे,आशा आवटे, सारिका धुमाळ, स्वाती तांबिरे, रुपाली सरोदे, कोमल कांबळे, संपत गोडे, संजय खराडे, प्रयोगशाळा परिचारक संतोष घरदाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. अपूर्व विज्ञान मेळावा व पालक सभा कार्यक्रम मुख्याध्यापक पांडुरंग पोटे व पर्यवेक्षिका रेखा भेगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहाने पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा