हरकचंद रायचंद बाफना डी. एड. कॉलेजची शैक्षणिक सहल यशस्वी संपन्न

 

वडगांव मावळ दि. ०७ (प्रतिनिधी)  शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ची शैक्षणिक सहल कोकण दर्शन नुकतीच संपन्न झाली. यावेळी छात्र अद्यापकांनी प्रतापगड, महाड चे चवदार तळे या ऐतिहासिक स्थळाना भेट देऊन माहिती घेतली. 


तसेच महाबळेश्वर मंदिर दर्शन, दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध हरहरेश्वर मंदिर दर्शन आणि दिवे आगर येथील सुवर्ण गणेशाचे दर्शन घेतले. त्याचबरोबर दिवेअगार येथील बीचचा आनंद लुटला. 



यावेळी प्राचार्य हिरामण लंघे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहल प्रमुख प्रा. राजेंद्र डोके यांनी सहलीचे सुंदर नियोजन केले. डॉ. मनोज गायकवाड, प्रा. शुभांगी हेद्रे, प्रा. शीतल गवई, लेखनिक नंदकिशोर व सेवक सोमनाथ धोंगडे यांनी सहल यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, सचिव अशोक बाफना आणि सर्व संचालकांनी शिक्षकांचे व छात्र शिक्षकांचे कौतुक केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा