शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 मध्ये प्राचार्य रावसाहेब सिरसट यांचे मार्गदर्शन



 तळेगाव दाभाडे दि. 8 (प्रतिनिधी) ज़िल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे व पंचायत समिती (शिक्षण विभाग ) पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने "शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 हे मावळ तालुक्यातील इ 1ली ते 12वी ला शिकवणारे शिक्षक यांच्यासाठी तिस ऱ्या टप्प्याचे चे प्रशिक्षण दि 3 मार्च 2025ते 7 मार्च 2025 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथील माऊंट सेंट हायस्कूल या ठिकाणी पार पडले. 


या प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे चे मुख्याध्यापक रावसाहेब किसन सिरसट यांनी आपली भूमिका पार बजावली. यावेळी मावळ तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक बंधू आणि भगिनी उपस्थित होते. या मार्गदर्शनाबद्दल रावसाहेब सिरसट  यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे येथील वरिष्ठ अधिव्याख्याता प्राध्यापक विकास गरड व मावळ तालुक्याचे शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष खांडगे व सचिव मिलिंद शेलार यांनी शिरसाट यांचे कौतुक केले.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा