स्नेहा थोरात हिची दिवाणी न्यायाधीश प्रथम वर्ग सुपर क्लास वन पदी निवड

 

पुणे दि. 29 (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्याचे अध्यक्ष प्राचार्य आदरणीय जी. के. थोरात सर व आदर्श गृहिणी सौ. संगीता थोरात यांची कन्या कु. स्नेहा thorat हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या गेलेल्या दिवाणी न्यायाधीश (प्रथम वर्ग -Super Class1) परीक्षेतून दिवाणी न्यायाधीश प्रथम वर्ग सुपर क्लास वन पदी निवड झाल्याबद्दल स्नेहाचे व तिच्या पालकांचे सर्वच स्तरांमधून अभिनंदन व कौतुक होत आहे. 



 लहानपणापासूनच कायद्याच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची मनीषा स्नेहाने व्यक्त केली होती. आई-वडिलांचे योग्य मार्गदर्शन अथक परिश्रम चिकाटी व जिद्द या जोरावर तिने हे यश खेचून आणले. पुण्यातील जेधे महाविद्यालयात एलएलबी करत असताना प्रथम क्रमांक मिळून आपल्या गुणवत्तेची झलक तिने दाखवून दिलेली होती. अभ्यासाबरोबरच नृत्याची  विशेष आवड स्नेहाने जोपासलेली आहे. अशा गुणी, हुशार, अष्टपैलू असलेल्या स्नेहाचे व तिच्या पालकांचे या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन व भावी न्यायालयीन क्षेत्रातील वाटचालीसाठी शुभेच्छा मिळत आहेत. तसेच नुकतेच जी.के. थोरात यांचे ज्येष्ठ चिरंजीव व स्नेहाचे बंधू अनिकेत थोरात यांची नांदेड जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्त पदी नियुक्ती झाली असून दोन्ही भाऊ व बहीण व आई वडील यांच्यावर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय तसेच मित्रपरिवारातून कौतुक व अभिनंदनाचा वर्ष होत आहे. 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास