कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दंत तपासणी शिबिराचे आयोजन

              

   


तळेगाव दाभाडे दि. ६ (प्रतिनिधी) दिनांक 04 मार्च 2025 रोजी तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचालित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दंत तपासणी शिबिराचे आयोजन लायन्स क्लब तळेगाव तर्फे करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ.चेतन ओसवाल उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, खजिनदार गौरी काकडे,  मुख्याध्यापिका ज्योती सावंत, पर्यवेक्षिका श्रावणी देसाई उपस्थित होत्या. 


या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. चेतन ओसवाल यांनी प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना दातांची काळजी कशी घ्यावी. स्वच्छता कशी ठेवावी.कोणता आहार घ्यावा  याविषयी मार्गदर्शन केले. प्री प्रायमरी विभागातील सर्व विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली. दंत तपासणी करताना त्यांना आढळून आलेल्या दाताच्या समस्या याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा करून योग्य तो सल्ला  दिला व मार्गदर्शन केले.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

व्ही .पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये तीन दिवसांसाठी “सॉफ्ट स्किल प्रोग्राम” चे यशस्वी आयोजन

कृष्णराव भेगडे फार्मसीला शैक्षणिक कामगिरीसाठी उत्कृष्ट दर्जा

व्ही.पी.एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी