प्रा.अरुण भालेराव यांना पीएचडी पदवी


 तळेगाव दाभाडे दि.18 (प्रतिनिधी) प्रा.अरुण भालेराव यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयात " A Study on uses of Library Resources and services in NAAC Accredited selected Engineering College Libraries in Maharashtra " या विषयावर 213 अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभ्यास केला . श्री सत्य साई युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड मेडिकल सायन्स भोपाळ या विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान केली. 


या संशोधनात त्यांना डॉ.नंदकिशोर पाटीदार हे मार्गदर्शक म्हणून लाभले. तसेच डॉ.सुरेशकुमार बाबू डॉ. संभाजी पाटील हे परीक्षक होते.संशोधन कार्यात डॉ. ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेच्या डायरेक्टर डॉ.सुचित्रा नागरे मॅडम, प्राचार्य डॉ.संध्या कुलकर्णी व डॉ.सचिन नाईक व डॉ. तुषार खाचणे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.


आय. सी. एस. एस. आर. या संस्थेने प्रा.अरुण भालेराव यांना बेस्ट लायब्ररीयन ऑफ इंडिया अवॉर्ड द कॅटेगिरी प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड 2022 ने सन्मानित  केले होते.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास