छोट्या वयात मिळवलेल्या पदव्या पाहून थक्क व्हावे, हीच मोठी पदवी : प्रा. प्रदीप कदम अल्प वयात जगाला गवसनी घातलेल्या डॉ. वैष्णवच्या पाठीवर परिवाराची शाबासकीची थाप

 

तळेगाव दाभाडे दि.14 (प्रतिनिधी): 'तुला जमणार नाही', असे बोलणारे लोक जोपर्यंत दूर राहतात, तोपर्यंत तुमच्या यशाचा रथ कुणी अडवू शकत नाही. छोट्या वयात मिळवलेल्या पदव्या पाहून थक्क व्हावे, हीच मोठी पदवी डॉ. वैष्णव काकडे याने मिळवली आहे. जग पाठीवर शाबासकीची थाप टाकेल, पण परिवाराने शाबासकीची थाप पाठीवर टाकल्याचे काकडे परिवाराचे उदाहरण दुर्मिळ म्हणावे लागेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांनी केले.

         

तळेगाव दाभाडे येथील वैष्णव शैलेश काकडे याने अगदी लहान वयात जगभर नावलौकिक मिळवला आहे. त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल येथील काकडे परिवाराच्यावतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी आयोजित विशेष व्याख्यानात डॉ. कदम बोलत होते. यावेळी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कृष्णाजी काकडे, हिराबाई शिखरे, प्राचार्य संभाजी मलघे, ह. भ. प. नितीन महाराज काकडे, आनंदराव शिंदे, शैलेश काकडे, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, संदीप काकडे आदिंसह ज्येष्ठ, तरुण वर्ग, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



         प्रा. प्रदीप कदम म्हणाले, की जे लोक आयुष्यभर कमवू शकणार नाहीत, इतक्या पदव्या वैष्णव याने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षापर्यंत कमावल्या आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या दोन मानद डॉक्टरेट मिळवणे, हा खऱ्या अर्थाने तळेगाव दाभाडेचा मोठा बहुमान आहे. तळेगावसारख्या छोट्या शहरातला सर्वासामान्य कुटुंबातल्या मुलामध्ये ग्लोबल टॅलेंट असू शकते, ही मोठी गोष्ट आहे. त्याग, समर्पण, कष्ट, दूरदृष्टी या गोष्टींमुळेच हे यश मिळवता आले. सोशल मीडियामध्ये अडकत चाललेल्या या काळात वैष्णव जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवत आहे, हे पालकांनी आपल्या मुलांना समजावून सांगायला हवे. तरच इतर मुलेही यातून बोध घेतील. मुले मोठ्या उंचीवर पाठवायची असतील, तर त्यांच्या प्रश्नांना पालकांनी उत्तरे दिली पाहिजेत, असे आवाहनही प्रा. कदम यांनी केले. 



          रामदास काकडे यांनी सांगितले, की वैष्णवने लहान वयात गाठलेली जागतिक उंची पाहून थक्क व्हायला होते. सामान्य कुटुंबातला मुलगा जगाच्या किती उंचीवर जाऊ शकतो, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे वैष्णव आहे. आपला समाज, गाव, जिल्हा, राज्य, देश पुढे नेण्याचे काम अशी मुले करताहेत, हे स्वागतार्ह आहे. मुलांच्या यशात आई-वडिलांचे योगदान, तळमळ मोलाची आहे. शिक्षणाकडे मालमत्ता म्हणून पाहणे गरजेचे बनले आहे. आजच्या मुलांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे, त्यामुळे त्यांना मोठमोठे शास्त्रज्ञ, वैज्ञानिक यांची उदाहरणे सांगणे, हे पालकांचे कर्तव्य आहे. तरच आपणही आपल्या घरात असे वैष्णव तयार करू शकतो, असेही रामदास काकडे यांनी सांगितले. 

          डॉ. मलघे म्हणाले, की इतक्या लहान वयात भौतिकशास्त्रात संशोधन करणे, ही सोपी गोष्ट नाही. पण वैष्णवने ते साध्य करून दाखवले आहे. त्यामुळे भारतातला मोठा संशोधक म्हणून तो मोठा नावलौकिक मिळवेल, हा विश्वास आहे. 

     

   प्रास्ताविक करताना वैष्णवचे वडील शैलेश काकडे यांनी वैष्णवने मिळवलेल्या पदव्यांची यादीच सांगितली. दोन मानद डॉक्टरेट, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा ब्रँड ॲम्बेसेडर, आयकॉन ऑफ इंडिया हे पुस्तक लेखन, भौतिक शास्त्रात सुवर्णपदके अशी लहान वयातील उत्तुंग कामगिरी त्यांनी सांगितली. 

        सत्काराला उत्तर देताना डॉ. वैष्णव काकडे यांनी सांगितले, की इयत्ता सहावीपासूनच खऱ्या अर्थाने माझ्या यशाला सुरुवात झाली. तेव्हापासून आजतागायत मागे वळून पाहिले नाही. भौतिक शास्त्रातील संशोधनातच करिअर करायचे, ही खूणगाठ मनाशी बांधल्याने आणि अभ्यासाला अध्यात्माची जोड, त्याग, सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यानेच हे यश मिळवू शकलो आहे. 

        सूत्रसंचालन गोरख काकडे यांनी, तर आभार नितीन महाराज काकडे यांनी मानले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा