स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलची एस.एस. सी. बोर्ड परीक्षेतील शंभर टक्के निकालाची परंपरा सलग बाराव्या वर्षीही कायम. तेजस्विनी संदीप चव्हाण 93.80% गुण मिळवून स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये प्रथम


 तळेगाव दाभाडे दि. 13 (प्रतिनिधी)   श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे या विद्यालयातील  एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये शिकत असणाऱ्या  विद्यार्थ्यांनी यश मिळवून यावर्षीही इयत्ता दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली.



       एस.एस.सी. बोर्ड 2024 - 25 च्या परीक्षेत सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी यशस्वी झाले. कु. तेजस्विनी संदीप चव्हाण हिने 93.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला; कु. सुरक्षा सर्जेराव कटरे हिने 93.40 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला; कु.कृष्णा स्वप्निल कदम याने 87.80 टक्के गुण मिळवून शाळेत तिसरा क्रमांक मिळविला.श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री.मिलिंद शेलार सर, शालेय पर्यवेक्षिका सौ.रेणू शर्मा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व मिठाई देऊन  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थी आनंदित होऊन भारावून गेले होते.


 संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक यांचे अमूल्य मार्गदर्शन, व विद्यार्थ्यांनी स्वतः सरावासाठी घेतलेले परिश्रम, यश मिळविण्याची प्रबळ इच्छाशक्ती, शिक्षकांचे लाभलेले मार्गदर्शन, वेळोवेळी आयोजित केलेल्या मार्गदर्शनपर व्याख्यानमाला यामुळे आम्हाला हे यश लाभले असे कुमारी चव्हाण तेजस्विनी हिने आपल्या मनोगतातून व्यक्त केले.



   यशाची अशीच गरुड भरारी घेऊन यापुढेही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवण्याची इच्छा संस्थापक अध्यक्ष श्री.संतोष खांडगे, सहसचिव तसेच शालेय समिती अध्यक्षा सौ.रजनीगंधा खांडगे ,उपाध्यक्ष श्री. दादासाहेब उर्हे, सचिव श्री.मिलिंद शेलार सर, कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब शिंदे यांनी व्यक्त केली व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के