अन्यायाचा महामेरू भ्रष्ट व्यवस्थेचा खरा बाहुबली कोण ? - श्री .अशोक देवकते

पुणे दि. 23 (प्रतिनिधी)
कल्पनेच्या पल्याड सर्व क्षेत्रीय उघडी नागडी मन विषन्न करणारी विषमता ही कोट्यावधी जनतेला नागवते बेघर बेरोजगार करते आणि नेतागिरीही त्यावर पोसते . स्वातंत्र्याची पहाट उजाडून   78 वर्षे झालेल्या गाव गाड्या खेडोपाड्यापर्यंत अंधारमय भविष्यात प्रकाशाची ज्ञानगंगा पोहोचावी असा उसनवारीने आव आणून बेंबीच्या देठापर्यंत कळवळा आणून सांगणाऱ्या सर्वच पांढरपेशी  कृती शून्यामुळे बहुजनांच्या पदरी पडते ती निराशा.



        भारतातील दुष्काळाने तहानलेल्या होरपळलेल्या अन्यायाने पिचलेल्या भेदरलेल्या फाटक्या निरक्षर जनतेने या मस्तवाल भ्रष्ट व्यवस्थेची गचांडी पकडून इंडियाला भारताने खडसावून जाब विचारण्याची वेळ आली आहे.
         शाळेची लायसन्स बंद दारूची लायसन्स चालू जनतेच्या विकासासाठी दारू विकून महसूल जमवावा लागतो दारिद्र्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रत्येक फाईलवर नैवेद्य ठेवल्याशिवाय सही होत नाही जणू काही हाताला लकवाच मारला आहे ,नाही का ? 



        भांडवलशाही प्रस्थापित घराण्याच्या घशात हातात शिक्षण व्यवस्थेची दोर दिल्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर सकारात्मक शासनाचे नियंत्रण नसल्यामुळे गरीब वंचित  शोषित घटकातील मुले पुढील 50 वर्षात उच्च आधुनिक व्यावसायिक शिक्षण तथा प्रशासनाच्या प्रवाहातून प्रवाहातून बाहेर पडण्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मनगटशाही झुंडशाहीच्या अदृश्य वरदहस्त असल्यामुळेच रोस्टर घोटाळे ऑनलाईन परीक्षा घोटाळ्याच्या माध्यमातून गोरगरिबांच्या वंचितांच्या नोकरी गिळंकृत करून तीन पिढ्यापासून जीवनमान उंचावण्याचे कित्येकांचे मनसुबे धुळीस मिळवले आहेत. अजून किती दिवस वंचिताच्या रक्ताचा नैवेद्य लागणार आहे कुणास ठाऊक? 



        ज्या गोऱ्या इंग्रज व क्रूर मुघलांनी जेवढा अमानुष अन्याय अत्याचार भारतीयावर केला त्यांचे समर्थन मुळीच कोणीही करणार नाही मात्र न भूतो न भविष्यती एवढा प्रचंड अन्याय अत्याचार या काळ्या   प्रस्थापित राजकीय व भ्रष्ट प्रशासनाने जातीवादी  वर्चस्ववादी झुंडशाही मानसिकता असलेल्या सत्तापीपासू अति महत्वकांक्षी प्रस्थापित व्यवस्थेने केला आहे. 
म्हणून अन्यायाचे खरे शोषक गोरे  नव्हे काळेच ! 
      भ्रष्ट वृत्तीच्या पिकाला किती खत पाणी द्यायचं ही ठरवण्याची वेळ आली आहे जातीव्यवस्थेच्या भिंती एवढ्या मजबूत झाल्या आहेत की फक्त पैसा खाताना जात आडवी येत नाही.
              आजा मेरी भ्रष्टाचार के गाडी मे बैठ जा 
No ED  
       No CBI
            No JAIL  
सबका साथ सबका विकास
आओ सब मिलकर खायेंगे 
देश को आगे बढायेंगे l



       वंचित पीडित शोषितांच्या मतपेट्यांच्या ढिगार्‍यावर स्वार होऊन मस्त वाल झालेल्या राजसत्तेपुढे 
ही आजादी झुठी है l
न्यायव्यवस्था आंधी हैl
भ्रष्टाचार मुक्त भारताचे मक्तेदार आधुनिक भारताच्या परिवर्तनाचा शिल्पकार बनू पाहणाऱ्या मायबाप हो काय सांगू रे बाप्पांनो 
शैक्षणिक आर्थिक राजकीय दृष्ट्या प्रगल्भ होऊन अर्थसत्ता ज्ञान सत्ता राजसत्ता प्रशासन  सत्तेत शिरकाव करून  अन्यायरूपी प्रस्थापितांच्या छाताडावर थैया थैया नाचून भ्रष्ट व्यवस्था मुळासकट उखाडून अन्यायाच्या विरोधात ठिणगी पेटून भ्रष्टाचाराच्या महामेरूला  बाहुबलीच्या  राज सत्तेला सुरुंग लागणार पैशातून सत्ता सत्तेतून पैसा   काय तो टॅक्स काय तो जीएसटी? काय त्या फुकट योजना ?रामायणातील रावणाला दहा तोंड होती परंतु वर्तमानातील रावणाला दहा पोट आहेत किती हव्यास सत्ता उपभोगण्याचा सर्वसामान्यांच्या मानगुटीवर बसून ?
जाती जातीत विष कालवून भ्रष्ट प्रशासन आणि राजकारण हातात हात घालून रंगेल आणि चंदेरी दुनिया निर्माण करण्याचा मानस सपनइक्या आणि लुटा रुच्या टोळीचा बादशहा यांची अदृश्य युती जनतेला मूर्ख समजून सत्तेचा राजा बनण्यासाठी चा तेरी भी चुप मेरी भी  चूप च्या नाटकाचा एपिसोड  अंत जवळ आहे  सब गोलमाल है भाई सब गोलमाल है
 काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्याचे चेले
मग सांगा अन्यायाचा महामेरू भ्रष्ट व्यवस्थेचा खरा बाहुबली कोण ? 
शब्दांकन 
श्री.अशोक देवकते


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के