श्री रमेश कुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची निकालाची उज्वल परंपरा

 


वडगाव मावळ दि. 5 (प्रतिनिधी) भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री रमेश कुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडगाव मावळ या ठिकाणी इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला.

कॉलेजचा सलग पाचव्या वर्षी 100% निकाल लागला आहे. कॉमर्स विभागामध्ये प्रथम क्रमांक कु.सावली खुशाल खांदवे 89.83 व कु. चिराग राहुल महाजन 85.33% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तसेच तृतीय क्रमांक जानवी संतोष जाधव 84.17% या विद्यार्थ्यांनी मिळविला आहे.


तसेच सायन्स विभागामध्ये प्रथम क्रमांक कीर्ती देवेंद्र घांची  78.00% द्वितीय क्रमांक शिवांजली जितेंद्र कुडे 75.83, तृतीय क्रमांक कुंजन जिवाजी चौधरी 75.33 मिळाले.



तसेच इतर सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी यश संपादन करून उत्तीर्ण झाले आहेत
 याप्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बाळासाहेब म्हाळसकर, उपाध्यक्ष सचिन नारायण ढोरे, सचिव राजेंद्र पांडुरंग वहिले उपस्थित होते सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या . व्यवस्थापक शहनाज अख्तर सुपरवायझर आदिनाथ आगळमे व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


 


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा