Skip to main content
मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना; सुदेश गिरमे अध्यक्ष, विशाल विकारी कार्याध्यक्ष तर रामदास वाडेकर यांची सचिवपदी निवड
वडगाव मावळ दि. 29 (प्रतिनिधी): मावळ तालुक्यात प्रथमच मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली असून, अध्यक्षपदी सुदेश गिरमे, कार्याध्यक्ष पदी विशाल विकारी तर सचिवपदी रामदास वाडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या नव्या संघटनेची स्थापना आणि पदग्रहण समारंभ पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी, सचिव शिबू नायर, पुणे शहराध्यक्ष पंकज बिबवे, लोकमतचे उपसंपादक योगेश माडगूळकर, ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, बबनराव भसे, ज्ञानेश्वर वाघमारे, विलास भेगडे, निखिल कवीश्वर, अतुल पवार, रेश्मा फडतरे, विशाल पाडळे, चेतन वाघमारे यांच्यासह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

या नव्याने स्थापन झालेल्या संघात लोणावळा, कामशेत, मावळ ग्रामीण, तळेगाव, तळेगाव प्रेस फाउंडेशन व देहूरोड पत्रकार संघाचे सर्व सदस्य समाविष्ट करण्यात आले आहेत. मावळ तालुक्याच्या इतिहासात प्रथमच तालुका पातळीवर सर्वव्यापी अशी संघटना उभी राहत असून पत्रकारांच्या विविध मागण्या व समस्यांबाबत सक्रियपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. राज्य अध्यक्ष किरण जोशी यांनी संघाची उद्दिष्टे, उपक्रम यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा संघ पुणे-मुंबई शहराच्या धरतीवर कार्यरत राहणार असून पत्रकारांसाठी निवास, आरोग्य सेवा, शैक्षणिक उपक्रम यांचा देखील समावेश केला जाणार आहे.

नवीन संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे यांनी पत्रकार संघाला राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. उपसंपादक योगेश माडगूळकर यांनी मावळातील सकारात्मक पत्रकारितेचे कौतुक केले. ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, निखिल कवीश्वर यांनी पत्रकार संघाच्या गरजांवर भाष्य केले. कार्यक्रमाचे स्वागत विशाल विकारी यांनी केले. प्रास्ताविक गणेश विनोदे यांनी तर सूत्रसंचालन रामदास वाडेकर यांनी केले. अध्यक्ष सुदेश गिरमे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ही संघटना मावळ तालुक्यातील पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन देईल, असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
सल्लागार : सोनबा गोपाळे, बबनराव भसे, विलास भेगडे, ज्ञानेश्वर वाघमारे, निखिल कवीश्वर
मुख्य पदाधिकारी : अध्यक्ष : सुदेश गिरमे, कार्याध्यक्ष : विशाल विकारी, उपाध्यक्ष : अमीन आफताब खान व भारत काळे, सचिव : रामदास वाडेकर, खजिनदार : संकेत जगताप, प्रकल्पप्रमुख : गणेश विनोदे, कायदेशीर सल्लागार : ॲड. किशोर ढोरे, सदस्य : सचिन शिंदे, चैत्राली राजापुरकर, सचिन ठाकर, मुकुंद परंडवाल. पदसिद्ध सदस्य : विशाल पाडाळे (अध्यक्ष लोणावळा), अतुल पवार (अध्यक्ष तळेगाव), रेश्मा फडतरे (अध्यक्ष तळेगाव प्रेस), चेतन वाघमारे (अध्यक्ष कामशेत)
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay
Comments
Post a Comment