अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथे शिक्षणशास्त्र विषयातील पीएच.डी. संशोधन केंद्र सुरू

 


वडगाव मावळ दि. १२ (प्रतिनिधी)श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय (बीएड व एम. एड.) वडगाव मावळ या ठिकाणी नव्याने आंतरविद्याशाखा अभ्यास अंतर्गत शिक्षणशास्त्र विषयातील पीएच. डी. संशोधन केंद्रास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मान्यता दिली आहे. 


अशा आशयाचे पत्र नुकतेच महाविद्यालयास प्राप्त झाले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे यांनी दिली आहे.



 येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2025- 26 पासून आंतरविद्याशाखा अभ्यास अंतर्गत शिक्षणशास्त्र या विषयातील पीएच. डी. करण्याची संधी  विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. 



मावळ तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी यासाठी 1990 साली सुरू झालेल्या श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या माजी मंत्री मदनजी बाफना या एकाच शैक्षणिक संकुला अंतर्गत डी. एड., बी.एड.,एम.एड. व पीएच.डी. करण्याचे संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे.



 तरी या संधीचा मावळ तालुक्यातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव अशोकजी बाफना यांनी केले आहे.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

व्ही .पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये तीन दिवसांसाठी “सॉफ्ट स्किल प्रोग्राम” चे यशस्वी आयोजन

कृष्णराव भेगडे फार्मसीला शैक्षणिक कामगिरीसाठी उत्कृष्ट दर्जा

व्ही.पी.एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी