एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

 


तळेगाव दाभाडे दि. २१  (प्रतिनिधी) २१ जुन २०२५ रोजी माईर एमआयटी पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये माईर भौतिकोपचार महाविद्यालय व माईर कॉलेज ऑफ नर्सिंग यांचे सहयोगाने  "एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 



यावर्षी “योग : एक पृथ्वी, एक आरोग्य” विषयावर आधारित, ज्यामध्ये वैयक्तिक आरोग्य व पर्यावरणाचे आरोग्य यामधील परस्परसंबंधावर भर देण्यात आला.
या प्रसंगी योग प्रशिक्षिका सौ. रुचिरा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योग सत्रांचे आयोजन करण्यात आले. या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.



योगासारख्या प्राचीन आणि वैज्ञानिक पद्धतीमुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारते, आणि याच बळावर आपण अधिक जबाबदारीने पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारू शकतो.
योग दिनाच्या निमित्ताने आरोग्यदायी व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संकल्प घेणे, हीच खरी मानवतेची गरज आहे. संस्थेचे उप वैद्यकीय अधीक्षक डॉ.नितीन गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ दर्पण महेशगौरी, समन्वयक डॉ तुषार खाचणे, प्रभारी प्राचार्या  डॉ दीपा नायर,  कार्यकारी संचालक डॉ विरेंद्र घैसास व कार्यकारी संचालिका डॉ सुचित्रा नागरे यांनी जागतिक योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के