व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे वृक्षारोपण

लोणावळा दि. 28 (प्रतिनिधी) व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तुकडी BSF-142 अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे NSS प्रमुख डॉ. हरीश हरसूरकर, महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रो. हुसेन शेख, प्रो. प्रिती चोरडे, प्रो. पूजा पाटील तसेच महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख नेहा शाह, प्रो.तनुजा हुलावळे, प्रो.नम्रता जंगम. प्रो.अमिषा नाईक, प्रो.श्रद्धा पुजारी, प्रो.मोनाली देशमुख, प्रो.मानसी बसुतकर, प्रो.अनुप देशमुख, प्रो श्रीकांत घाटगे, श्री.पराग मराठे, स्नेहल कुटे, वैभव कापसे, रघुनाथ शेडगे यांनी वृक्षारोपण करून सक्रिय सहभाग नोंदवला. या उपक्रमात चिकू, पेरू, आवळा यांसारखी विविध फळझाडे तसेच फुलझाडे लावण्यात आली. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. डॉ.संदीप गाडेकर संपा...