आनंद विद्यानिकेतनचे संतोष थोरात गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 


पुणे दि.26 ऑगस्ट 2025 पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या वतीने स्व. मो.गो. चाफेकर जीवनगौरव पुरस्कार, निवृत्त सभासद, गुणवंत शिक्षक सभासद व  गुणवंत पाल्यांच्या सन्मान सोहळा नुकताच मॉर्डन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शिवाजीनगर पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. सुरेश गोसावी सर होते. 
या कार्यक्रमात  संतोष थोरात यांना त्यांनी केलेल्या वीस वर्षातील उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेऊन गुणवंत शिक्षक सभासद पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.



संतोष थोरात आनंद विद्यानिकेतन विमाननगर येथे इंग्रजीचे अध्यापक असून त्यांना आतापर्यंत जवळपास 25 पुरस्काराने सन्मानित केलेले आहे तसेच त्यांची इंग्रजीची  तीन पुस्तके ही प्रकाशित झालेली असून त्यांनी आपल्या शाळेमध्ये जर्मन भाषेचा अभिनव उपक्रम राबवलेला आहे. नुकताच दैनिक सकाळने सुद्धा त्यांच्या  शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांच्याविषयी लेख प्रसिद्ध केला होता. सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पी.एचडी.चे संशोधन करीत आहेत.



त्यांच्या या सन्मानामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनचा  वर्षाव होत आहे.
याचवेळी प्रथमवर्ग दिवाणी न्यायाधीश पदी महाराष्ट्र लोकसभा आयोगातून निवड झाल्याबद्दल स्नेहा गोरखनाथ थोरात तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रुतिका सरोदे, पै. हिरामण बनकर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा.शशिकांत शिंदे, प्राचार्य शिवाजीराव कामथे  यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतपेढीचे अध्यक्ष राज मुजावर यांनी केले तर आभार जेष्ठ संचालक महादेव माने यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे आयोजन नियोजन पतपेढीचे सर्व संचालक मंडळ तसेच कर्मचारी वर्गाने केले होते.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या मेंबर डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, हेमलता मराठे, महाराष्ट्र टीडीएफ चे अध्यक्ष जी.के. थोरात , महाराष्ट्रा राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष मा. हरिचंद्र गायकवाड , पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे मा. अध्यक्ष श्री. सुजित जगताप, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.अ.ल. देशमुख तसेच सर्व सभासद व शिक्षक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा