पवना धरण सतर्कतेचा इशारा नदीपात्रात 1400 क्युसेक विसर्ग सुरू





पवनानगर दि. : 28-09-2025 @ 09:00 (प्रतिनिधी)  पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की सद्यस्थितीमध्ये पवना धरण 100% भरलेले आहे व धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रात 1400 क्युसेक विसर्ग चालू आहे.



  पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊसास सुरुवात झाली असून आज सकाळी 10:30 वाजेपर्यंत नदीपात्रात होणाऱ्या *विसर्गामध्ये वाढ करून एकूण विसर्ग 2880 क्युसेक करण्यात येणार आहे.
पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.



     सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत  जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्ष खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे-११ यांनी केले आहे.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा