नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स तळेगांव दाभाडे देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेत लहान गटाचा प्रथम क्रमांक


तळेगाव दाभाडे दि.२१ (प्रतिनिधी) ऐतिहासिक शाळा नवीन समर्थ विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स तळेगाव दाभाडे श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय  देशभक्तीपर समूह गायन स्पर्धेत घवघवीत यश मिळवले, नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स तळेगांव दाभाडे प्रशालेने  स्पर्धेसाठी दोन गटांची निवड करून स्पर्धेसाठी पाठवले यात लहान गटातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेच्या नावलौकिकात भर घालण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे.



यामध्ये नवीन समर्थ विद्यालयातील इयत्ता पाचवी ते सातवी लहान गटातील विद्यार्थ्यांनी श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे एम.आय.डी.सी यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य तालुकास्तरीय देशभक्तीपर समूह गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे.




या  गटातील विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री श्री. संजय तथा बाळा भेगडे, उपाध्यक्ष श्री. गणेश खांडगे, सचिव श्री. संतोष खांडगे, खजिनदार श्री. राजेश म्हस्के, सहसचिव आणि शालेय समिती अध्यक्ष श्री. महेश भाई शहा* शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वासंती काळोखे मॅडम, पर्यवेक्षिका सौ. अर्चना शेडगे मॅडम यांनी  विजयी विद्यार्थ्यांचे तसेच पालक व मार्गदर्शक शिक्षिका सौ. जगताप मॅडम व कु. नेवाळे मॅडम सांस्कृतिक विभागप्रमुख श्री. बोरुडे सर व सर्व शिक्षक, तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.



बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा