तळेगावात आजपासून दुर्गा माता दौड चे आयोजन



तळेगाव दाभाडे दि. २२ (प्रतिनिधी) नवरात्री उत्सवा निमित्त विश्व हिंदू परिषद. बजरंग दल यांच्या वतीने तळेगाव दाभाडे शहरात दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षाप्रमाणे यंदाही दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात आल्याची माहिती विश्व हिंदू परिषद .बजरंग दलचे प्रशांत भेगडे यांनी दिली.
नवरात्रीत केला जाणारा स्त्री शक्तीचा जागर आणि तिच्यातल्या प्रचंड ऊर्जेला सलाम करण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराज.धर्मवीर संभाजी महाराज यांनी मृत्यूच्या मुखात उभे राहून निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ जगतजनानी श्री तुळजाभवानीच्या आशीर्वादाने उभे राहू शकले.


दुर्गा देवी जवळ तेच आशीर्वाद पुन्हा मागणीची परंपरा म्हणजे दुर्गा माता दौड होय. भारत मातेच्या रक्षणासाठी कटिबद्ध असणारी शिवशंभू रक्तगटाची व राष्ट्रभक्तीची अवघी तरुण पिढी घरोघरी उत्पन्न व्हावी देव देश आणि धर्मरक्षणाच्या राष्ट्राच्या सांस्कृतिक सत्व स्वाभिमानाच्या बाबतीत जागे व्हावे यासाठी श्री दुर्गामाता दौड चे  आयोजन अनेक वर्षापासून होत आहे.
या स्फूर्तीदायक देशभक्ती. राष्ट्रभक्ती. धर्मभक्ती देणाऱ्या उपक्रमात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने केले आहे.


तळेगावात अनेक वर्षापासून दुर्गामाता दौड ला असंख्य शिवप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या वर्षाची दुर्गामाता दौड नवरात्रीच्या शुभारंभाच्या दिवशी सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५रोजी सुरू होईल आणि गुरुवार दिनांक २ ऑक्टोंबर २०२५ला दुर्गामाता दौड ची सांगता होणार आहे.



दुर्गामाता दौड चे  वेळापत्रक पुढील प्रमाणे

 दिनांक २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोंबर रोज सकाळी ६ वाजता पुढील दिलेल्या ठिकाणावरून दौडला प्रारंभ होणार आहे.
२२ सप्टेंबर.= ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर ते बनेश्वर शिवमंदिर.
२३ सप्टेंबर= शेतकरी मित्र मंडळ ते धर्मवीर संभाजी तालीम मंडळ.
२४ सप्टेंबर= धर्मवीर संभाजी मित्र मंडळ ते श्री लक्ष्मीनारायण मंदिर.
२५ सप्टेंबर= लिटिल हार्ड सोसायटी ते स्वराज मित्र मंडळ.
२६ सप्टेंबर= श्री वरसुबाई मंदिर ते श्री दत्त मंदिर.
२७ सप्टेंबर= काळुबाई मंदिर मोहर प्रतिमा ते श्री विष्णू मंदिर (तेली आळी चौक)
२८ सप्टेंबर=सावली वृद्धाश्रम ते श्री गजानन महाराज मंदिर.
२९ सप्टेंबर= श्री खंडोबा मंदिर ते श्रीराम मंदिर.
३० सप्टेंबर= एंजल हिल्स सोसायटी ते श्री दत्त मंदिर(डाळ आळी)


१ ऑक्टोबर= श्री विठ्ठल मंदिर मारुती मंदिर चौक ते चौराई मित्र मंडळ.
विशेष कार्यक्रम=२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८: वाजता मारुती मंदिर चौक येथे विजयादशमी उत्सवा निमित्त शस्त्रपूजन व रावण दहन कार्यक्रम होणार आहे .
तसेच समस्त तळेगाव नगरीच्या कल्याणासाठी रविवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुभाष चौक येथील श्री दत्त मंदिरात नवचंडी याग चे आयोजन देखील करण्यात आले आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा