तळेगाव दाभाडे : शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर रोजी
दत्त मंदिर, सत्यसाई कॉलनी, तळेगाव स्टेशन येथे
श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंदोरी प्रणीत) आणि सिद्धीविनायक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सामुदायिक दुर्गा सप्तशती पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पारायणामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उद्योजक गणेश काकडे यांनी आपल्या मार्गदर्शनात दुर्गा सप्तशतीमध्ये देवीच्या स्तुतीतून संकटमोचन, आरोग्य, ऐहिक व आध्यात्मिक प्रगती तसेच सर्वांगीण कल्याणाची प्रार्थना केली जाते. देवीची आराधना ही भक्तांना आत्मबल व सकारात्मक ऊर्जा देणारी मानली जाते असे प्रतिपादन केले.
त्याचप्रमाणे वैशाली निगडे यांनी दुर्गा सप्तशती पाठाचे महत्त्व विशद केले. सामुदायिक दुर्गा सप्तशती पाठ वाचन करण्यासाठी परिसरातील माता-भगिनी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होत्या.

या कार्यक्रमासाठी रोहित लांगे सुनिल कारंडे,निलेश पारगे, नितीन दाभाडे,हेमा दाभाडे,वैशाली निगडे,मोहिनी काळे,नीलिमा गुंजाळ, अक्षय अवघडे आदिनाथ भोसले,संध्या देसाई, नाटक ताई, गाभने ताई, मोरे ताई तसेच स्वामी परिवारातील सेवेकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी श्रीरंग कलानिकेतन वनश्री नगर तळेगाव स्टेशन या ठिकाणी देखील सामुदायिक दुर्गा सप्तशती पाठ वाचन याचे आयोजन केलेले आहे तरी मोठ्या संख्येने माता भगिनींनी या ठिकाणी उपस्थित रहावे असे आव्हान माता भगिनींनी या ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay
महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇
https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/
Comments
Post a Comment